Arambol News | Goa Illegal Hotel Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Hotel: ‘त्‍या’ हॉटेलवर आज बुलडोझर!

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Illegal hotel: मोरजी, गिरकरवाडा-हरमल येथील सर्वे क्रमांक ६३/९२ या जागेत बेकायदेशीर हॉटेल उभारण्यात आले आहे. ही एकूण चार मजली इमारत आहे.

परंतु या बांधकामाला कसल्याच प्रकारचे परवाने नसल्यामुळे उद्या मंगळवार दि. ३१ ऑक्‍टोबर रोजी त्‍यावर बुलडोझर फिरवला जाणार आहे, अशी माहिती हरमलचे सरपंच बेर्नार्ड फर्नांडिस यांनी दिली.

दरम्‍यान, समुद्रकिनारी भागात उभारण्‍यात येणाऱ्या बेकायदा बांधकामांसाठी हा एक धडा ठरणार आहे.सदर बेकायदा हॉटेल बंगळुरु येथील अशोक खंडारे यांच्या मालकीचे आहे. या बांधकामाला हरमल पंचायतीचा परवाना नाही. तरीही चार मजली इमारत उभी राहिली आहे.

त्यासंदर्भात तक्रारदार रवी हरमलकर यांनी पंचायतीकडे तक्रार केली होती. त्याचीही दखल घेतली गेली नाही. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.'

न्‍यायलयाने निर्देश देऊनही पंचायतीने बांधकाम पाडण्याची अंमलबजावणी केली नव्‍हती. विशेष म्‍हणजे अशा प्रकारची बांधकामे सीआरझेड विभागात मोठ्या प्रमाणात उभी राहत आहेत.

उच्च न्यायालयाने २५ ऑक्टोबर रोजी हे चार मजली हॉटेल सील करण्याचे आदेश पेडणे उपजिल्हाधिकारी आणि पोलिस निरीक्षकांना दिले होते. शिवाय हॉटेलची पाणी व वीजजोडणी ४८ तासांत तोडण्याचेही निर्देश दिले होते.

भरतीरेषेपासून २५ ते ५० मीटर अंतरावरही बांधकामे

मांद्रे मतदारसंघातील मोरजी, आश्‍‍वे-मांद्रे, हरमल या किनारी भागात बिगरगोमंतकीय जमिनी विकत घेऊन मोठमोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स, क्लब गेस्ट हाऊस, आलिशान बंगले, कॉटेजीस्‌ उभारत आहेत.

विशेष म्‍हणजे राजकर्त्यांना हाताशी धरून व सरकारी यंत्रणेचा आशीर्वादाने समुद्राच्‍या भरतीरेषेपासून २०० मीटरच्या आत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात बांधकामे केलेली आहेत. काही किनारी भागात तर भरतीरेषेपासून २५ ते ५० मीटर अंतरावरही बांधकामे केल्‍याचे दिसून येते.

सीआरझेड कायदा सांगतो की समुद्राच्‍या भरतीरेषेपासून २०० मीटरच्या आत कसल्याच प्रकारचे पक्के बांधकाम करता येत नाही. मात्र १९९१ पूर्वीचे बांधकाम असेल तर त्याची पुनर्बांधणी, दुरुस्ती करण्यास परवानगी दिली जाते.

उद्या मंगळवारी (३१ रोजी) हे बेकायदा हॉटेल जमीनदोस्‍त करण्‍यात येणार आहे. त्यासाठी गटविकास अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच संबंधित सरकारी यंत्रणांना कळविले आहे. बांधकाम मोडण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली असून उद्या सकाळी दहा वाजल्यापासून कारवाई करण्‍यात येणार आहे.

- बेर्नार्ड फर्नांडिस, हरमल सरपंच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT