Goa Police on First Day of Sunburn Festival 2023: Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival मध्ये पहिल्याच दिवशी गोव्यातील 'सिंघम'ची कारवाई; ध्वनीमर्यादा ओलांडल्याने पोलिसांनी एक स्टेज केले बंद

महोत्सवातील संगीत रात्री 10 ला बंद म्हणजे बंद...

Akshay Nirmale

Goa Police on First Day of Sunburn Festival 2023: गोव्यात गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला आज, गुरूवार २८ डिसेंबरपासून सुरवात झाली खरी.

पण, पहिल्याच दिवशी आवाजाची ठरवून दिलेली मर्यादा ओलांडल्याने गोवा पोलिसांनी महोत्सवातील एक स्टेज रात्री 9 लाच बंद केले.

गोव्यातील 'सिंघम' पोलिस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या पोलिस उपाधिक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ही कारवाई केली.

ऑथोरिटींनी सनबर्नमध्ये आवाजाची 65 ते 75 डेसिबल मर्यादा निश्चित केली आहे. तथापि, गुरूवारी संध्याकाळी सनबर्न महोत्सवात स्टेज वन येथे मर्यादेपेक्षा जास्त आवाज होता.

विशेष म्हणजे, सनबर्नच्या प्रवेशद्वारावरच आवाजाचे मॉनिटरिंग करणारे, आवाजाची तीव्रता, पातळी मोजणारे एक उपकरण येथे लावण्यात आले आहे. त्याच्या स्क्रीनवर आवाजाती तीव्रता कळते.

त्यावरून पोलिस पथकाने लगेचच आवाज वाढल्याचे लक्षात येताच कारवाई करत स्टेज एक बंद करण्यास भाग पाडले.

जिवबा दळवी यांच्या पथकाने त्वरेने ही कारवाई केल्यानंतर महोत्सवातील इतर ठिकाणांचाही आवाज कमी करण्यात आला. पोलिसांच्या कारवाईनंतर अनेक म्युझिकप्रेमींनी येथून काढता पाय घेण्यास सुरूवात केली.

दरम्यान, रात्री दहापर्यंत संगीत वाजवण्यास परवानगी आहे. त्यामुळे पोलिस त्यावरही लक्ष ठेऊन होते. त्यामुळे रात्री बरोबर 10 वाजता येथील संगीतही बंद करण्यात आले. गोवा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे अनेकांकडून कौतूक करण्यात येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT