Rent A Vehicles Dainik Gomantak
गोवा

Rent A Vehicles: खासगी वाहने भाडेपट्टीवर देणाऱ्यांवर कारवाई

Rent A Vehicles: वाहतूक पोलिस सक्रिय : वाहने जप्त करणार

दैनिक गोमन्तक

Rent A Vehicles: राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा खासगी दुचाकी व चारचाकी वाहने भाडेपट्टीवर देण्याचे प्रकार घडत आहेत. त्याची गंभीर दखल घेत वाहतूक पोलिस विभागाने मंगळवारपासून (21 नोव्हेंबर) पुढील काही दिवस अशा वाहन मालकांविरुद्ध धडक विशेष मोहीम सुरू केली आहे.

ही वाहने जप्त करून कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली. वाहतूक खात्याकडून ‘रेंट ए बाईक’ व ‘रेंट ए कार’साठी परवाना असलेल्या वाहन मालकांनाच ही वाहने भाडेपट्टीवर देण्याचा अधिकार आहे. मात्र सतत सुट्या असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येत असल्याने काही खासगी वाहन मालक त्यांची वाहने भाडेपट्टीवर देत आहेत. या संदर्भातल्या तक्रारी वाहतूक खाते तसेच वाहतूक पोलिसांकडे आल्या होत्या.

त्यामुळे परवाना असलेल्या वाहन मालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अचानक विशेष मोहीम सुरू करून खासगी दुचाकी वा चारचाकी वाहन घेऊन फिरणाऱ्या पर्यटकांचा संशय आल्यास त्यांना अडवून तपासणी सुरू केली आहे.

किमान 2 हजार रुपये दंड

खासगी वाहन भाडेपट्टीवर दिल्यास वाहतूक पोलिस ती जप्त करणार व याचात्याच्याविरुद्ध न्यायालयात पाठविला जातो. मालकाला किमान २ हजार रुपये दंड किंवा त्यापेक्षा अधिक दंड देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. या मोहिमेमुळे जे खासगी वाहने भाडेपट्टीवर देत होते त्यांच्यावर लगाम बसला आहे. काहींनी भाडेपट्टीवर दिलेली खासगी वाहने पर्यटकांकडून परत घेण्याचे प्रकार आज घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT