Sewage Water Issue: सांडपाणी साचल्याने सर्वणमध्ये दुर्गंधी

Sewage Water Issue: रोगराईची भीती: तातडीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी
Sewage Water Issue
Sewage Water IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Sewage Water Issue: फुटलेल्या गटाराचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने डिचोली तालुक्यातील सर्वण येथे सांडपाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

सांडपाणी उघड्यावर वाहत असून, प्राथमिक शाळा आणि वाचनालयाजवळ तर दुर्गंधीयुक्त सांडपाणीसाचले आहे. गेल्या पंधराहून अधिक दिवसांपासून ही समस्या आहे. ही समस्या त्वरित निकालात काढावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Sewage Water Issue
ST Reservation - एस टी समाजाला 2027 पर्यंत राजकीय आरक्षण मिळेल - तवडकर | Gomantak TV

सांडपाण्याचा बंदोबस्त करण्याकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. हे गटार वारंवार फुटत असले, तरी त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.

पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा. यासाठी पंधरा वर्षांपूर्वी कारापूर-सर्वण पंचायतीतर्फे वरचावाडा ते सरकारी प्राथमिक शाळेपर्यंत साधारण शंभर मीटर लांबीचे गटार बांधले आहे.

Sewage Water Issue
Goa Comunidade: सेरूला कोमुनिदाद जमिनीवरील घरे नियमित करण्याची मागणी

मात्र या गटारात सांडपाणी सोडण्यात येत असल्याने ते तुंबून अधूनमधून सांडपाणी उघड्यावर वाहत असते. सध्या हे गटार पुन्हा फुटले असून, गटारातील सांडपाणी उघड्यावरून वाहत आहे.

गटारातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे गटार तुंबले की ते फुटून सांडपाणी बाहेर उघड्यावर वाहत असते.

सर्वत्र ओंगळवाणे स्‍वरूप

सध्या गटारातील सांडपाणी बाहेर फुटल्याने प्राथमिक शाळा आणि वाचनालय परिसरात गलिच्छतेचे दर्शन घडत आहे. परिसरात तर असह्य दुर्गंधी पसरली आहे. दुर्गंधीमुळे तेथून ये-जा करणाऱ्यांना तर चक्क नाक मुठीत धरावे लागत आहे.

शाळा आणि वाचनालयाजवळ तर मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. त्यामुळे वाचकांसह शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांनाही या सांडपाण्याच्या दुर्गंधीचा उपद्रव सहन करावा लागत आहे. या सांडपाण्यामुळे डासांची पैदासही वाढली असून, रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com