पणजी: येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यासाठी प्रतिदिन 2 हजार रुपये भाडे भरावे लागेल, अशी माहिती पणजी महापालिका कार्यालयात परवानगीसाठी गेलेल्या आयपीएचबी कंत्राटी कर्मचाऱ्यांना (Contract Workers) सांगण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पणजी महापौरांनी दखल घेतली आहे. ज्यांनी हे सांगितले त्यांची नावे उघड केल्यास त्यांना सेवेतून निलंबित करतो, असे आश्वासन दिले आहे. (action against contract workers in Goa)
आयपीएचबी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांना सेवेतून काढण्यात आल्याने आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी तसेच पणजी महापालिकेकडे (Panaji Municipal Corporation) परवानगीसाठी अर्ज केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अजून परवानगी दिली नाही. परवानगी मिळाल्यानंतर आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यासाठी दरदिवशी 2 हजाराचे भाडे भरावे लागेल, असे सांगण्यात आल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट या कर्मचाऱ्यांनी
आज केला. ज्या दिवशी महापालिकेच्या काऊंटरवर निवेदन स्वीकारण्यास कोण होते, त्याचा शोध सुरू आहे. महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले की, आझाद मैदानावरील धरणे आंदोलनासाठी कधीही भाडे आकारण्यात आलेले नाही. महापालिकेचे कर्मचारी असे प्रकार करून बदनामी करत आहेत. जे कोणी कर्मचारी महापालिकेच्या नावाने लूट करील त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत त्यांनी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.