Action against 43,000 drivers in Vasco da Gama in goa Dainik Gomantak
गोवा

वास्कोत 43 हजार वाहनचालकांवर कारवाई; 'इतक्या' लाखांचा दंड वसूल

वास्को (Vasco) वाहतूक खात्याचे पोलिस निरीक्षक सुदेश नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपाययोजना आखून चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: गेल्या वर्षभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तालुक्यातील 43 हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 54 लाख 7 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. चालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती करण्यासाठी विविध उपक्रमही वाहतूक पोलिसांमार्फत (Traffic Police) राबविण्यात आले. (Vasco Traffic Latest News)

वास्को (Vasco) वाहतूक खात्याचे पोलिस निरीक्षक सुदेश नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपाययोजना आखून चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्व 3 हजार गुन्ह्यांची नोंद करून 54 लाख 7 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला. वास्को वाहतूक खात्यात पोलिसांची (Police) कमतरता असतानाही नार्वेकर यांनी योग्य नियोजन करून काम चोखपणे पार पाडले.

काही नियम पाळणे आवश्यक

  • जलदगतीने वाहन चालवणे - 452 चालक - 1 लाख 52 हजार रुपये दंड.

  • निष्काळजीपणाने वाहन चालवणे - 629 चालक - 4 लाख 30 हजार 950 रुपये दंड.

  • मद्यपान करून गाडी चालवणे - 45 चालक - न्यायालयीन कारवाई

  • धोकादायकरित्या वाहन चालवणे - 5 लाख 13 हजार 450 रुपये दंड.

  • विनाहेल्मेट वाहन चालविणे - 16,524 चालक - 16 लाख 60 हजार 100 रुपये दंड.

  • वाहन चालवताना भ्रमणध्वनीवर बोलणे - 193 चालक - 1 लाख 22 हजार 350 रुपये दंड.

  • चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करून पुढे जाणे - 36 चालक - 3600 रुपये दंड.

  • रस्ता चुकीच्या पद्धतीने ओलांडणे - 30 जण - 3 हजार रुपये दंड.

  • योग्यप्रकारे लाईट नसताना वाहन चालवणे - 113 चालक - 11 हजार 300 रुपये दंड.

  • प्रखर प्रकाशझोतात वाहन चालविणे - 42 चालक - 4 हजार 250 रुपये दंड.

  • विनापरवाना वाहन चालविणे - 430 चालक - 2 लाख 25 हजार रुपये दंड.

  • केबिनमध्ये प्रवाशांना बसविणे - 35 हजार 500 रुपये दंड.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT