ACGL कामगारांचा संप  Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांच्या भरवश्यावर ACGL चे कामगार कामावर रुजू

मंगळवार पर्यंत तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आहे आश्वासन

Dainik Gomantak

ACGL: एसीजीएल कंपनीच्या कामगारांच्या पगार वाढ (Demand for salary increase) हा कळीचा मुद्दा ठरून साडेतीन वर्षांपासून वाटाघाटी करून सुद्धा काहीच निष्पन्न होत नसल्याचे पाहून या कंपनीच्या दोन्ही कामगार संघटनेने कंपनी तसेच सरकार यांना पंधरा दिवसांची नोटीस देऊन तोडगा काढला नसल्याने दि 18 ऑक्टोबर पासून कामगार पाच दिवस संपावर गेले होते, परंतू शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून आपण कंपनीच्या व्यवस्थापना सोबत बैठक घेऊन कामगारांची पगार वाढ व इतर मागण्या संबंधी मंगळवार पर्यंत तोडगा काढण्याची ग्वाही दिली, त्यामुळे कामगार संघटनाने सदर संप गेल्या शुक्रवारी स्थगित करून सोमवारपासून कामा़वर जाण्याचे घोषित केले व त्याप्रमाणे आज पासून दोन्ही विभागांतील कामगार कामावर झाल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष गुणाजी परब यांनी दिली आहे.

होंडा औद्योगिक वसाहतीत गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या एसीजीएल कंपनीच्या दोन्ही विभागांतील 'कामगारांचा पगार वाढ' व इतर मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ कामगार संपावर गेले होते व आपल्यावर सरकार व कंपनी व्यवस्थापन कशा प्रकारे अन्याय करीत असल्याचे दाखवून देण्यासाठी वाळपई तसेच सांखळी शहरात मोर्चा काढून 20 व 21 ऑक्टोबर या दोन दिवसात परीसर दाणाणून सोडला होता, यावेळी त्याना भाजप वगळता इतर राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठींबा दिला होता. त्यामुळे सरकार व कंपनी व्यवस्थापन यांच्यावर बराच दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे सदर संपाची धार आणखीन त्रीव होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

त्यात सदर कामगारांना महाराष्ट्र राज्यात कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेचे मार्गदर्शन लाभले होते. यामुळे या कामगारांच्या संपाला वेगळे वळण तर लागणार नाही ना अशी शंका वाटू लागली होती. पण शेवटी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यां बरोबर बैठक घेऊन आपण या प्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापना सोबत बैठक घेऊन मंगळवार पर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते व कामावर चढण्याची विनंती केली होती.

कामगार संघटनेने मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या शब्दांला मान देऊन गेल्या शुक्रवारी सर्व कामगारांना हा विषय सांगून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत मंगळवार पर्यंत काय तोडगा काढतात यांच्याकडे लक्ष ठेवून सदर संप स्थगित केला होता. त्यानुसार शनिवार व रविवार कामगारांच्या सुट्टीचा दिवस असल्याने आज दि 25 पासून दोन्ही विभागांतील कामगार कामावर चढले आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात बंद असलेली एसीजील कंपनीच्या दोन्ही विभागांतील धडधड पुन्हा सुरू झाली आहे.

त्याच प्रमाणे या संपाच्या काळात कंत्राटदारांनी सुद्धा कामगारांना सहकार्य करताना संपाच्या काळात पाच दिवसांत एकाही कंत्राटी कामगारांला कामांवर पाठवले नव्हते, त्यामुळे कंत्राटी कामगारांना सुद्धा यांचा फटका बसला होता, तर कंपनीची बस उत्पादनात प्रक्रिया पूर्ण पणे ठप्प असल्याने होंडा औद्योगिक वसाहतीत कंपनीवर अवलंबून असलेल्या लघुउद्योग सुद्धा बंद ठेवावे लागलें असल्याने तेथील उद्योजक तसेच त्यांच्या कडे असलेल्या कामगारांना आर्थिक फटका बसला होता, त्यामुळे सर्व थरातून हा संप मिटावा अशी मागणी होत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT