कोलवाळ तुरुंगातील कारनामे Dainik Gomantak
गोवा

कोलवाळ तुरुंगातील कारनामे; आरोपींना विवस्त्रावस्थेत उठाबशा काढण्याची शिक्षा

कोलवाळ तुरुंगातील प्रकार; व्हायरल व्हिडिओमुळे सुरक्षेचा पुन्‍हा पंचनामा

दैनिक गोमन्तक

मडगाव : कायद्याचा उपमर्द केलेल्या गुन्हेगारांना तुरुंगात स्थानबद्ध करून ठेवले जात असले तरी त्यांचेही आत काही कायदे कानून असतात, याचा प्रत्यय कोलवाळ तुरुंगात (colvale central jail) पुन्हा एकदा आला. कोलवा येथे दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्काराच्या (Rape Case) आरोपाखाली या तुरुंगात ठेवण्यात आलेल्या तीन संशयितांना इतर कैद्यांनी (prisoners) चक्क विवस्त्रावस्थेत उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. या शिक्षेची अंमलबजावणी होत असतानाचा व्हिडिओ (Video) काढून तो व्हायरल करण्यात आल्याने कोलवाळ तुरुंगातील कारनामे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. (Accused Punished without clothes in colvale Prison, Goa)

तुरुंगात गुन्हेगारांना ठेवण्यात येत असले तरी तेथेही काही गुन्ह्यांना माफी नसते. त्यात स्वतःच्या आई-वडिलांचा खून करून आलेले आरोपी तर दुसरे अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारे आरोपी. असा कोणताही आरोपी तुरुंगात आल्यास त्याला इतर कैद्यांकडून शिक्षा ही ठरलेलीच असते. त्याच कायद्याला अनुसरून या बलात्कार प्रकरणातील तीन कैद्यांना विवस्त्र करून त्यांच्याकडून उठाबशा काढून घेण्यात आल्या.

‘टायगर’नेही बनवला होता व्‍हिडिओ

दरम्‍यान, सध्या ज्याचा हवेरी येथे खून झाला त्या अन्‍वर ऊर्फ‘टायगर’ या गुंडाला याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यावेळी इतर कैद्यांना धाक दाखविणारा अन्वरचा एक व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता. त्यावेळीही कोलवाळ तुरुंगातील ठिसूळ सुरक्षाव्यवस्था अशीच लोकांसमोर आली होती. त्यानंतर या घटनेची चौकशीही सुरू करण्यात आली होती, पण त्या चौकशीचे पुढे काय झाले ते अद्याप समजू शकले नाही.

उलटसुलट प्रतिक्रिया

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर समाजमाध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काही जणांनी अशा नराधमांना अशीच शिक्षा झाली पाहिजे, असे म्हटले आहे तर काही जणांनी हे चित्रिकरण करण्यासाठी जेलमधील कैद्यांकडे मोबाईल कसा आला आणि तुरुंगात जेलगार्ड असताना असे प्रकार होतातच कसे, असे प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT