Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: अमली पदार्थ प्रकरणी आरोपी निखिल वारखंडकर याला पाच वर्षे सश्रम कारावास

म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निवाडा केला.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यातील ड्रग्स प्रकरणी आरोपी निखिल वारखंडकर याला पाच वर्षे सश्रम कारावास देण्यात आलेला आहे. म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निवाडा केला. आरोपी निखिल वारखंडकर हा शिरोडा महाराष्ट्र येथील रहिवासी असून, एएनसीने 2011 मध्ये किरणपाणी, पेडणे येथे गोवन व ही कारवाई केली होती.

(Accused Nikhil Warkhandkar sentenced to five years rigorous imprisonment in drug case )

गेल्या 8 महिन्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये गांजा, चरस, एलएसडी, एमडीएमए, एक्स्टसी गोळ्या, पावडर, कोकेन, चरस तेल, हेरॉइन आणि गांजा यांचा समावेश आहे, हे सर्व एकूण 91 किलोपेक्षा जास्त वजनाचे आहेत. त्यामुळे राज्यात अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आठ महिन्यांत 3 कोटीचे अमली पदार्थ जप्त

गोवा पोलिसांनी अमली पदार्थाविरोधातील आपली कारवाई वेगाने सुरु केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आठ महिन्यांत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 114 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. तसेच दर आठवड्याला सरासरी तीन ठिकाणी छापेमारी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गेले काही दिवस गोवा पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी विरोधात कारवाईचा वेग वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात सक्रीय असलेल्या अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी गोवा पोलिस पथक हैदराबादमध्ये दाखल झाले आहे. या कारवाईत आज एकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोव्यात अमली पदार्थांचा चांगलाच सुळसुळाट सुरु आहे. या रॅकेटचा तपास करण्यासाठी गोवा पोलिस पथक हैदराबाद येथे दाखल होत एका संशयिताला ताब्यात घेतले असुन महेश गौड असे या संशयिताचे नाव आहे. त्याला हैदराबादच्या सिद्धीपेट जिल्ह्यातून अटक करण्यात आले आहे. या बाबत आणखी काही संशयितांच्या अटकेची शक्यता असून पोलिस तपास करत आहेत. याबाबत अधिकची माहिती लवकरच देऊ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

SCROLL FOR NEXT