Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : अपहरण प्रकरणातील आरोपीला अटक, केपे पोलिसांची कारवाई

16 वर्षांच्या मुलीच्या अपहरण प्रकरणात त्याचा सहभाग होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime केपे येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी केपे पोलिसांनी किशन प्रकाश यादव (19) सोनारभाट साळगाव (मूळ उत्तरप्रदेश) येथील युवकाला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक गुप्तहेरांच्या मदतीने अपहरण प्रकरणात सहभागी असलेल्या एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी सदर मुलगी कॉलेजमध्ये जात आल्याची सांगून घराबाहेर पडली होती. ती दुपारी घरी न आल्याने सदर मुलीच्या आईने केपे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार केपे पोलीसांनी तापसकामाला सुरुवात केली असता मुलीच्या मोबाइल नंबर तसेच इतर माध्यमातून तपास लावला असता काल रात्री दि. 26 रोजी मडगाव रेल्वे स्थानकावर दोघांनाही ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी सांगितले. ती दोघेही उत्तर प्रदेश मध्ये पळून जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

केपे पोलिसांनी यादव याला आज केपे न्यायालयापुढे उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सदर मुलीला सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पालकांच्या स्वाधीन करणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. पुढील तपास केपे पोलीस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT