Goa Shack Policy Dainik Gomantak
गोवा

Goa Shack: नव्या धोरणानुसार शॅक परवाने मंगळवार नंतर मिळणार

दैनिक गोमन्तक

नव्या शॅक धोरणानुसार शॅक परवाने आता मंगळवारनंतरच मिळू शकणार आहेत. पर्यटन खात्याने शॅक धोरण तयार केले तरी पर्यावरण खात्याने किनाऱ्यांचा धारण क्षमता अहवाल अद्याप पर्यटन खात्याला न दिल्याने हे काम मागे पडले आहे.

पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, पर्यावरण सचिव अरुणकुमार मिश्रा, पर्यावरण संचालक स्नेहा गिते (ज्या किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवही आहेत) हे सारेजण सोमवारी उशिरा राज्यात परतणार आहेत. ते पोर्तुगाल आणि नेदरलॅण्डच्या दौऱ्यावर गेले आहेत.

पर्यावरण खात्याकडून कोणत्या किनाऱ्यावर किती शॅक घालता येतील याची माहिती पर्यटन खात्याला देण्यात आल्यानंतरच परवान्यांची सोडत काढता येणार आहे.

उत्तर गोव्यामध्ये 259 तर दक्षिण गोव्यात 105 मिळून 370 परवाने मागील वेळेस देण्यात आले होते. यंदाही दक्षिण गोव्यातील परवाना संख्येत बदल होण्याची तशी शक्यता नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.

सिकेरी ते बागा या टापूत 195 परवाने दिले गेले होते. त्यावेळी खासगी शॅक असलेल्या ठिकाणांच्या समोर सरकारी परवान्यांचे शॅक नको असा वाद झाला होता. त्यामुळे प्रत्येक किनाऱ्याची धारण क्षमता अभ्यासून उत्तर गोव्यातील शॅक परवान्यांच्या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT