Shree Mahaganpati, Khandola Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2023: गोमंतकात गणेशभक्तीची प्राचीन परंपरा; चौथ्या शतकापासून उपासना

परकीयांच्या जुलमी राजवटीनंतरही परंपरांचे जतन

संजय घुग्रेटकर

Shree Mahaganpati, Khandola: पुण्यभूमी गोमंतकात गणेशभक्तीची परंपरा चंद्रगुप्त मौर्य राजवटीच्या काळापासून सुरू झाली, असे इतिहासकारांचे मत आहे. इसवी सन चौथ्या व पाचव्या शतकातील जीर्ण झालेल्या; परंतु वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती आजही गोव्यात पाहायला मिळतात.

बदामीच्या चालुक्‍यांनी आपल्या राजवटीत गणेशाला अग्रस्थान दिले होते. गोव्यावर राज्य करणाऱ्या चालुक्‍याची राजधानी रेडी (सिंधुदुर्ग) होती. तेथे आजही तत्कालीन काळातील जांभ्या दगडात कोरलेली गणेशप्रतिमा आहे.

त्यानंतर गोव्यावर राज्य केलेल्या शिलाहार, कदंब, विजयनगरच्या राजवटीतही श्रीगणेश पूजेला अग्रस्थान होते. त्यामुळेच आजही गोवेकरांचा मुख्य सण गणेश चतुर्थीच आहे.

बदामीच्या चालुक्याची राजधानी काही काळ रेडी होती. त्या काळात त्यांनी रेडी येथे जांभ्या दगडातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर गोव्यात आलेली शिलाहार, कदंब, विजयनगरकरांनीही देवदैवतांची भूमीचे पावित्र राखले.

गणेशासह इतरही उपासनेत खंड पडू दिला नाही. गावा-गावांत गणेश मंदिरे उभारली. पण पोर्तुगिजांनी अत्याचार, अनाचार माजविला आणि मंदिराचा विद्ध्वंस केला.

अनेक पाऊलखुणा

राज्यात इतर ठिकाणीही प्राचीन गणेश मंदिराचे दाखले अजूनही सापडतात. सत्तरीत पाच प्राचीन गणेश मंदिरे आहेत. त्यापैकी सातोडेतील गणेशमूर्ती पुरातन आहे.

मंगेशी, धाकणे, मडकईसुद्धा सातव्या, आठव्या शतकातील मूर्ती आहेत. कुडणे, पार्सेत सातव्या शतकातील गणेशमूर्ती असून साळावली धरणाजवळ ११ व्या शतकातील गणेशमूर्ती आहे.

जुने गोवेचा ‘यल्लास्वामी’!

जुने गोवे म्हणजे पूर्वीचे ‘येळा’ आणि या ‘येळा’ गावचा स्वामी हा निस्सीम गणेश भक्त होता. म्हणून एकेकाळी गणेशाला यल्लास्वामी म्हणत. या ठिकाणचे मंदिर नष्ट केल्यानंतर तेथे चर्च उभारले. मांडवीच्या किनारीच तीर्थक्षेत्र होते.

त्यात शिव, गणेश व इतर मंदिरे होती. अनेक ठिकाणी तळी होती. काही ठिकाणी ती आजही आहेत. येथील यल्लास्वामीची मूर्ती जवळच्या दीपवती (दिवाडी) बेटावर सुरक्षित ठेवण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025: चार चेंडूंत चार विकेट्स! दुलीप ट्रॉफीत पहिल्यांदाच 'या' खेळाडूने रचला इतिहास; जम्मू काश्मीरचा पठ्ठा चमकला

Viral Video: बापाने मुलाकडून घेतली अशी शपथ, व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक; 'स्वतःचा जीव पणाला लावून...'

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; 'यलो अलर्ट' जारी

Boat Accident: स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटली! 49 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता; 17 जणांना वाचवण्यात यश

Duleep Trophy 2025: पुनरागमन ठरलं निष्फळ! दुलीप ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची निराशाजनक कामगिरी, गोलंदाजीत केलं ‘शतक’

SCROLL FOR NEXT