Goa Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accident: वाहनचालकांच्या बेफिकीर वृत्तीमुळेच अपघात

नागरिकांचे मत : नियमांचे पालन करून गाड्या चालवल्यास अपघात होतील कमी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Road Accident गोव्यात हल्ली होणारे अपघात बघितल्यास  गाडी चालवणे भीतीचे वाटत आहे. राज्यातील अपघातांमधील बळीही वाढत आहेत. 

काही नागरिकांना  याविषयी विचारले असता बहुतेकांना वाटतेय की वाहनचालकांची बेफिकीर वृत्ती आणि हलगर्जीपणामुळेच जास्त अपघात होतात. 

जशी गोव्यात वाहनांची संख्या वाढत आहे, तशी अपघातांची संख्याही वाढतेय. पोलिस यंत्रणेकडून कडक कारवाई, रस्ते सुरक्षा आठवडे, रस्ते अपघातांविषयी जागृती करूनही त्याचा हवा तेवढा फायदा होताना दिसत नाही. 

या रस्ते अपघातांमागची कारणे काय असू शकतील, याबाबत जाणकरांची मते जाणून घेतली. 

वाढते अपघात हे फक्त बेजबाबदार वाहन चवलण्याने न होता त्यामागे आणखीन घटक कारणीभूत आहेत.

यंदाच्या एप्रिल महिन्यात जे अपघात झालेत त्यात बरेचसे अपघात हे वाहनचालकाला डुलकी लागल्याने झालेत. अचानक वाढलेल्या उष्णतेचा थेट परिणाम जास्त करून दुचाकी चालकांवर झाला. - रोलंड मार्टिन्स, संयोजक, गोवाकॅन

गोव्यात घडणारे रस्ते अपघात थांबवणे एवढे सोपे नाही. गोव्यात जे पर्यटक येतात ते जास्त वेळ भाड्याने गाड्या चालवायला घेतात आणि बेफाम गाड्या चालवतात.

राष्ट्रीय महामार्गावरील अपघात हे अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे होतात. त्यात वाहनचालकांचा बेफिकीरपणा हा अपघातास कारणीभूत ठरतो. - परशुराम सोनुर्लेकर, अध्यक्ष, गोवा फर्स्ट

गोव्यात लोकांना रुंद रस्ते दिसले की ते आपली वाहने सुसाट चालवतात. दारू पिऊन, बेशिस्तपणे व सुसाट वेगाने गाडी चालवल्यामुळे अनेक अपघात होतात.

गोव्यात येणारे काही पर्यटक तसेच काही स्थानिक लोकही नियम धाब्यावर बसवून वाहने चालवतात, हे बंद झाले पाहिजे तरच अपघातांवर नियंत्रण ठेवता येईल.

- आदित्य शेणॉय भांगी, हिंदी साहाय्यक प्राध्यापक, गोवा विद्यापीठ

रस्त्यावर वाहनांची रहदारी वाढल्यामुळे अपघातही वाढले आहेत. अगोदर लोक संयमपूर्वक गाड्या चालवायचे. आजची पिढी ही सुसाट गाड्या चालवताना दिसत आहे.

बाहेरून येणारे पर्यटक तर गोव्यात आल्यावर नियमांना तिलांजली देऊन आपल्याला वाटते तशा गाड्या चालवतात. त्यामुळे बहुतेक पर्यटनस्थळांवर अपघात होतात.

- संजय बर्डे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT