Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: पाजीफोंडमध्ये जावेदवर दफनविधी; रेन्ट अ कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

राज्यात वाढलेले अपघातांचे प्रमाण सध्या चिंतेची बाब बनली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Latest News

राज्यात वाढलेले अपघातांचे प्रमाण सध्या चिंतेची बाब बनली आहे. काही दिवसांपूर्वी भरधाव ‘रेंट ए कर’च्या धडकेने मांडवी पुलावरून खाली पडून मृत झालेल्या जावेद सडेकरचा दफनविधी पाजीफोंड येथील दफनभूमीत 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 करण्यात आला.

22 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वा. जावेद आपली दुचाकी घेऊन एका महत्त्वाच्या कामासाठी पणजीच्या दिशेने जात होता, यावेळी मांडवी पुलावर पोचला असता त्याला कारचालक अंकित त्रिपाठी याने समोरून एका वाहनाला ओव्हर टेक करताना जोरदार धडक दिली.

अंकित त्रिपाठी हा पणजीहून पर्वरीला जात होता. धडकेने जावेद आपल्या दुचाकीवरून उसळून थेट पाण्यात पडला व त्यांचा अंत झाला. जावेद बार्देश येथे राहत असला, तरी बालपणी आके-मडगाव येथे वास्तव्यास होता.

 जावेदचा मृतदेह 36 तास नदीच्या तळाशी

अपघात झाल्याच्या ठिकाणाहून नजीकच तो मृतदेह सापडल्याने 36 तास तो नदीच्या तळाशीच होता, असे स्पष्ट झाले. काहींच्या म्हणण्यानुसार, कारच्या धडकेमुळे जखमी झालेल्या जावेद याने जखमी अवस्थेतच नदीच्या पृष्ठभागावर येत मदतीची याचना केली होती. त्यानंतर कोणी मदतीला धावून न आल्याने तो घाबरला असावा. नंतर तो खोल पाण्यात बुडाला.

त्यामुळे तो नदीच्या तळाशी रुतून राहिला असावा. त्यामुळे त्याचा मृतदेह तेथेच अडकून पडला असावा. जावेद याचा मृतदेह सापडल्याने अटकेत असलेला कारचालक अंकित त्रिपाठीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT