Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: वालंकिणीहून येताना भाविकांवर काळाचा घाला; गोव्यातील सात भाविक जखमी

जखमींमध्ये चार मुलांचा समावेश

सुशांत कुंकळयेकर

Goa Accident News : तामिळनाडू वालंकिणी येथील सायबिणीचे दर्शन घेऊन गोव्यात येताना एका मिनी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

धारवाड- गोवा मार्गांवरील रामनगर नजीक असलेल्या कुंभार्डा येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला मिनी बसने धडक दिल्याने हा अपघात घडला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात गोव्यातील सात भाविक जखमी झाले आहेत तर एका भाविकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जी ए 03 व्ही 0289 या क्रमांकाच्या मिनी बस वाहनातून 10 जण तामिळनाडू येथील वालंकीणी येथे दर्शनासाठी गेले होते. वालंकीणी येथून गोव्याच्या दिशेने येत असताना भाविकांचे वाहन धारवाड- गोवा मार्गांवरील रामनगर नजीक असलेल्या कुंभार्डा येथे आले.

यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मिनी बसने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडक दिली. हा अपघात गुरुवारी पहाटे साडे पाचच्यासुमारास घडला. अपघातात गोव्यातील सात भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

त्यापैकी एक भाविकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. म्हापसा येथील टोजेंटा परेरा (15), इझाबेल फर्नांडीस (40), जीन परेरा (45), मालीन फर्नांडीस (8), जॉन्सन फर्नांडीस (3) व जेनुस्टा परेरा (17) जखमी झाले आहेत तर जॉन फर्नांडीस (38) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये 4 मुलांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waterfall Ban: पावसाळ्यातील अपघातांवर अंकुश! उत्तर गोव्यातील धबधबे अन् नद्यांमध्ये प्रवेशास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

Hartalika Tritiya 2025: अखंड सौभाग्य आणि सुयोग्य वरासाठी 'हरितालिका व्रत'; वेळ आणि पूजेची पद्धत काय? सविस्तर जाणून घ्या

Asia Cup 2025: आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध 'सूर्या'ची बॅट 'खामोश', आकडेवारी पाहून चाहते चिंतेत; माजी खेळाडूने उपस्थित केले सवाल!

Court Verdict: मंत्री मॉविन गुदिन्हो यांना मोठा दिलासा, 4.52 कोटींच्या वीजदर सवलत घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता

रविंच्या 'फ्री हँड' फॉर्म्युल्यामुळे गुन्हेगार थरथर कापत होते; आज मात्र कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT