Accident 

 

Dainik Gomantak 

गोवा

बोगमाळोहून दाभोळीच्या दिशेने जाणारी पर्यटक बस कलंडली

बसमधील 40 प्रवासी जखमी झाले.

दैनिक गोमन्तक

वास्को: बोगमाळोहून दाभोळीच्या दिशेने जाताना एक पर्यटक बस (Bus) दुपारी रस्त्याच्या कडेला कलंडल्याने या बसमधील 40 प्रवासी (Passengers) जखमी झाले. यात चार जणांना गंभीर स्वरूपाची जखम झाली. जखमी पर्यटक छत्तीसगड येथील असून ते गोव्यात (Goa) बोगमाळो येथे पर्यटनास आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी पर्यटक बस जीए 08-व्ही-1789 सुमारे 40 पर्यटकांना घेऊन बोगमाळो समुद्र किनाऱ्यावर आली होती. समुद्र किनारी पर्यटकांनी पर्यटनाचा आस्वाद घेतल्यानंतर ती बस पर्यटकांना घेऊन परत बोगमाळो मार्गे दाभोळीच्या दिशेने जात असताना येथील चर्च (Church) जवळ एका वळणावर बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने त्याने करकचून ब्रेक मारला असता बस एका बाजूला रस्त्याच्या कडेला कलंडली. बाहेर मोठा आवाज झाल्याने या भागातील लोकांनी पाहिले असता बस आडवी झालेली पाहण्यात आली.

स्थानिक लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. या बसमध्ये एकूण ४० पर्यटक प्रवासी होते. तसेच घटनास्थळी पोलिस तसेच अग्निशमन दल दाखल झाले व त्यांनी अपघातात (Accident) जखमी झालेल्या प्रवाशांना मदत केली. जखमींना तातडीने चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. जखमींपैकी चार पर्यटकाना गंभीर स्वरूपाची जखम झाली असून, या सर्व जखमींवर चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT