Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

अपघात की घातपात? सांकवाळ येथे आठव्या मजल्यावरुन कोसळून झारखंडच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

Goa Crime News: सांकवाळ येथील एमव्हीआर कन्स्ट्रक्शनच्या साईटवर आज (शुक्रवारी) ही घटना घडली.

Pramod Yadav

Goa Crime News

सांकवाळ येथे बांधकामाधीन इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. मूळ झारखंड येथील असलेल्या मृत सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांनी घटनेबाबत संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

सांकवाळ येथील एमव्हीआर कन्स्ट्रक्शनच्या साईटवर आज (शुक्रवारी) ही घटना घडली.

राजू मांझी (31, रा. झारखंड) असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांकवाळ येथे एमव्हीआर कन्स्ट्रक्शनच्या एका इमारतीचे काम सुरु आहे. या निर्माणधीन इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन कोसळून राजू यांचा मृत्यू झाला.

राजू यांच्यासोबत अचानक झालेल्या अपघातामुळे त्यांचे कुटुंबीय हादरले असून, त्यांनी या सर्व घटनेप्रकरणी संशय व्यक्त केला आहे. आणि सखोल तपासाची मागणी केली आहे.

याप्रकरणी सर्व घटनाक्रम तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, घटना घडल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी गोळा झाला होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, सर्व अँगल तपासून पाहिले जात आहेत, असे पोलिसांनी म्हटले आहे.

सुरक्षा रक्षक अचानक आठव्या मजल्यावरुन कोसळ्याने हा अपघात आहे का घातपात आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT