Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात: एकाचा मृत्यू

कुळे पोलिसांनी एकाला केली अटक

दैनिक गोमन्तक

गोव्यात सध्या पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. यामूळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांच्या बातम्यांचा मागोवा घेतल्यास आपल्या लक्षात येईल की, राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कारण पावसामूळे रस्त्यावरुन वाहने घसरणे, पाण्यामूळे रस्त्यावर तयार झालेले खड्डे यांचा चालकांना अंदाज न येणे या मुख्य कारणांमूळे वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12.30 च्या सुमारास सुकतळी- मोले येथील राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. (One killed in National Highway accident at Molem )

मिळालेल्या माहितीनुसार सुकतळी-मोले येथील राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनांमध्ये अपघात झाला. हा अपघात तीन वाहनांमध्ये झाला आहे. या अपघातात विनय देसाई ( बिजापूर, कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघाताची माहिती मिळताच कुळे पोलिसांनी अपघात स्थळी पोहोचत पंचनामा केला. तसेच कारचालक अंकित जयसिंग जाधव (बिजापूर) याला ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार एक जीप मोलेहून फोंडा येथे जात होती. यावेळी दुसरी एक जीप रस्त्याच्या बाजूला जीप पार्क केली होती. त्यावेळी मोलेहून सुसाट वेगाने धावणारी वेर्णा कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रेटा कारला वेगाने धडकली.

यात क्रेटा कार रस्त्याच्या बाजूच्या झाडाला धडकल्यानंतर पार्क केलेल्या जीपला जाऊन धडकली. यात क्रेटा कारमधील विनय देसाई याचा जागीच मृत्यू झाला. क्रेटा कार धडक दिलेली वेर्णा कार अदाजे 150 मीटर अंतरावर जाऊन रस्त्याच्या याजूला कलंडली. अस असले तरी अपघातात वेर्णा कारमधील 4 जण सुखरूप बचावले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच कुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत.अपघाताचा पंचनामा केला.व यावेळी वेर्णा कारचालक अंकित जाधव यांना अटक करण्यात आली आहे. तसेच याबाबत पोलीसांनी बोलताना वाहना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपझघात झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT