Accident On Mandovi Bridge Dainik Gomantak
गोवा

मांडवी पुलावर टेम्पो आणि दुचाकींचा अपघात, दोघे गंभीर जखमी; पुलावर वाहतूक कोंडी

अपघात झाल्यानंतर पुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली व वाहतूक संथ गतीने सुरू होती.

Pramod Yadav

Accident On Mandovi Bridge: मांडवी लहान पुलावर टेम्पो आणि दोन दुचाकी यांच्या अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही दुचाकी चालकांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

अपघात झाल्यानंतर पुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली व वाहतूक संथ गतीने सुरू होती.

(Accident On Mandovi Bridge two bike riders injured)

मिळालेल्या माहितीनुसार, लहान मांडवी पुलावर टेम्पोला दुचाकीने मागून धडक दिल्याने दुचाकीचा अपघात झाला. यावेळी दुसऱ्या दुचाकीचा देखील येथे अपघात झाल्याने दोन्ही दुचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे पुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

अपघातानंतर येथील लोकांना रूग्णवाहिकेला किंवा पोलिसांना फोन करण्याबाबत माहितच नसल्याने तेथे रूग्णवाहिका व पोलिस यायला उशीर झाला.

दरम्यान, काही वेळानंतर रूग्णवाहिका व गोवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रूग्णवाहिकेद्वारे रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर, अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यातून हटवून मार्ग मोकळा करण्यात आला. यामुळे बराचकाळ झालेली वाहतूक कोंडी मोकळी झाली.

अपघातात दुचाकींचे नुकसान झाले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT