Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : हेल्मेट असूनही काळाने गाठले; गवंडाळीतील अपघातात पोलिस ठार

टेम्पोचालकावर गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक डिजिटल

गवंडाळी येथील जंक्शनवर शुक्रवारी सकाळी 9.30वा. टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात सांतइस्तेव येथील पोलिस कर्मचारी प्रदीप परब हे जागीच ठार झाले, तर मागे बसलेली त्यांची पत्नी जखमी झाली.

विशेष म्हणजे, प्रदीप यांनी हेल्मेट घातले होते; परंतु टेम्पोच्या धडकेने ते खाली पडले आणि डोके रस्त्यावर आपटून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रदीप यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, तर पत्नीला गोमेकॉत प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी पाठवण्यात आले. याप्रकरणी टेम्पोचालक योगानंद नाईक (कुंभारजुवे) याला अटक केल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली.

पोलिस खात्यात वाहन विभागात कामाला असलेले प्रदीप हे सकाळी दुचाकीवरून कामावर येत होते. त्यांनी हेल्मेट घातले होते. दुचाकीवर पाठीमागे त्यांची पत्नी माधुरी बसली होती.

जंक्शन धोकादायक

कुंभारजुवे-गवंडाळी पूल झाल्याने पणजी-माशेल अंतर कमी झाले. पण या ठिकाणचे जंक्शन धोकादायक आहे. बऱ्याचदा गवंडाळीकडून येणारी वाहने पुलावरून येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाहीत. शिवाय रेल्वे गेट खुले झाल्यानंतर जुने गोवेकडून वाहने भरवेगाने येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT