पेडणे
सविस्तर माहितीनुसार, खडी घेऊन सावंतवाडीहून पणजीच्या दिशेने जाणारा एम एच ०७ - एच ०३३९ या क्रमांकाचा टिप्पर ट्रक मालपे येथील जंक्शनपासून काही अंतरावर पोचल्यावर ट्र्कचा मागचा टायर फुटला व पलटी होऊन पडला. पडल्यावर ट्रकच्या मागच्या चाकासहीत मागचा काही भागही तुटला. त्यातील मागची चाके व काही भाग महामार्गावर काही भाग मार्गाच्या दरीतील मध्यभागी, तर पुढची चाके व केबिनसह दरीत आणखी पुढे गेला. या केबिनमधे चालक बबन भालेकर व वाहक दिनेश केसरकर हे अडकून पडले. पेडणे अग्निशमन दलास ही माहिती मिळाल्यावर लगेच दलाच्या जवानांनी केबिनमध्ये अडकलेल्या चालक व वाहकाला बाहेर काढले.
याच दरम्यान वळपे येथे सरकारी कॉलेजजवळ राष्ट्रीय महामार्गावर गोव्याहून मुंबई येथे औषधे घेवून जाणारी एम एच ०४ - जी आर ८६९९ लॉरी पलटी झाली व लॉरीचा चालक शिवकुमार गुप्ता (मुंबई) हा केबिनमध्ये अडकून पडला. त्याला पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. पेडणे अग्निशमन दलाचे उपप्रमुख प्रशांत धारगळकर, चालक रामदास परब व प्रशांत सावळ देसाई, जवान सहदेव चोडणकर, विकास चौहान, शेखर मयेकर, अविनाश नाईक, प्रदीप आसोलकर, प्रजोत होबळे, मनोज साळगावकर व अमोल परब यांनी यासाठी चांगली कामगिरी बजावली.
संपादन - यशवंत पाटील
|