Accident in Raibandar Panjim 
गोवा

सरकारी वाहनाची दोन दुचाकींना जोरदार धडक

रायबंदर येथील अपघातात महिलेचा जागीच मृत्यू; दोघे गंभीर

दैनिक गोमन्तक

पणजी : रायबंदर बायपास मार्गावर रविवारी रात्री उशिरा सरकारी वाहनाची दोन दुचाकींना धडक बसली. या अपघातात सांताक्रूझ येथील पुष्पलता स्वामी या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीवरील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जुने गोवे (Old Goa) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी वाहनाची दुचाकींना जोरदार धडक बसल्याने एका दुचाकीवरील मागे बसलेली महिला खाली पडली व तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिचे निधन झाले. दुचाकीवरील अन्य दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेने गोमेकॉ (GMC) इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र ही धडक इकती जोरदार होती, की एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातप्रकरणी (Accident) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. गोव्यात वाढलेल्या अपघातांची संख्या पाहता नवीन मोटार वाहन कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र असं असलं तरीही गोव्यात अपघात सुरुच असल्याचं चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT