Accident Death Matane Dodamarg Dainik Gomantak
गोवा

Accident Death: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार, एकाची प्रकृती गंभीर; कामावरून घरी परतताना घाला

Accident Death Matane Dodamarg: माटणे येथे वजनकाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन मये येथील दीपक हरमलकर (वय ५९) यांचा मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

दोडामार्ग/पणजी: माटणे येथे वजनकाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन मये येथील दीपक हरमलकर (वय ५९) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले गणू उसपकर हे गंभीर जखमी झाले आहेत.

दुसऱ्या दुचाकीवरील वझरे येथील रामा सुरेश गवस आणि त्याच्यासोबत असलेले जयराम शिरोडकर यांची प्रकृतीही गंभीर आहे. तिघांनाही बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली.

दीपक हे दुचाकी घेऊन दोडामार्गहून आयी मार्गे गोव्याच्या दिशेने जात होते. गणू उसपकर हे त्यांच्या मागे बसले होते. तर, वझरे येथील रामा गवस व त्यांचा मित्र जयराम शिरोडकर हे दोघे ‘एफझेड’ दुचाकीवरून आयीहून दोडामार्गच्या दिशेने येत होते. माटणे येथे दुचाकींमध्ये अपघात झाला.

घरी परतताना घाला

मये येथील दीपक हरमलकर हे वझरे येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होते. कामानिमित्त ते रोज दोडामार्ग–आयी मार्गावरून ये-जा करत असत. बुधवारीही नेहमीप्रमाणे ते कामावरून घरी परतत असतानाच माटणे येथील वजनकाट्याजवळ काळाने घाला घातला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: भरधाव वेग अन् अचानक नियंत्रण सुटलं! गँगस्टर अतिक अहमदच्या मुलाच्या कार अपघाताचा व्हिडिओ व्हायरल; 6 दिवसांनंतर भयानक वास्तव आलं समोर

Candolim Illegal Project: शेतात सांडपाणी अन् खारफुटीची कत्तल! कांदोळीतील बेकायदा प्रकल्पांचा मुद्दा चर्चेत; मुख्‍यमंत्र्यांकडे तक्रार

Goa FDA Raid: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; बेळगावातील पुरवठादाराकडून 120 किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करुन केली नष्ट

Goa Crime: कळंगुट पोलिसांना फोन आला अन्... कारचे दार उघडताच बसला मोठा धक्का; 41 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Par River Pollution: अस्नोडातील पार नदीच्या प्रदूषणाची गंभीर दखल! 'या' रिसॉर्टची ग्रामस्थांकडून पोलखोल; मानवाधिकार आयोगाने बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT