Accident News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Accident: मद्यधुंद कार चालकाची दुचाकीला धडक; बाप-लेक थोडक्यात बचावले

Goa Accident News: कारने दुचाकीला दिलेली धडक एवढी जोरदार होती की वडील व मुलगा रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. त्‍यात वडिलांच्या हाताला तर मुलाच्या नाकाला मार बसला.

Sameer Panditrao

Mapausa Car Bike Accident

बार्देश: हाऊसिंग बोर्ड-म्हापसा येथील एका वळणावर आज बुधवारी दुपारी अडीचच्‍या सुमारास झालेल्‍या अपघातात वडील व मुलगा जखमी झाला. त्‍यांना उपचारांसाठी इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, इनोव्‍हा कार (केए १८ एम ८५४५) पुढे जात असलेल्या हिरो होंडा मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्‍वार व त्‍यांच्‍या मागे बसलेला त्‍यांचा मुलगा जखमी झाला. दोन्‍ही वाहने शिवोलीहून म्हापशाच्‍या दिशेने येत होती.

कारने दुचाकीला दिलेली धडक एवढी जोरदार होती की वडील व मुलगा रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. त्‍यात वडिलांच्या हाताला तर मुलाच्या नाकाला मार बसला. तेथील लोकांनी धाव घेऊन दोघांनाही उठविले आणि नंतर म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले. कारचालक नशेत असल्‍याचे समजते. दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT