Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : पर्वरीत अपघातग्रस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक; वाहतुकीचे तीनतेरा

अपघातात कुणालाही इजा झाली नसली तरी ट्रकचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पर्वरी सुकूर भागात शुक्रवारी रात्री एक विचित्र अपघात पाहायला मिळाला. दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झालेल्या ट्रकला समोरुन दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने पर्वरीत काल रात्रीपासून वाहतुकीचे तीनतेरा वाजले. या अपघातात कुणालाही इजा झाली नसली तरी ट्रकचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.

पर्वरी जुना बाजार येथील हायवे 66 वर दोन ट्रक मध्ये अपघात होऊन जवळपास चार तास वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. या संदर्भात अधिक माहिती अशी की, रात्री अकरा वाजताच्या सुमारास, पणजीमधून म्हापशाला जाणाऱ्या दिशेने पर्वरी जुना बाजार येथे असलेल्या रस्त्यावरील दुभाजकाचा अंदाज न आल्याने अवजड मालवाहू ट्रक नंबर MH 07 A 9641 दुभाजकावर चढला आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रस्त्यावर थांबला. पहाटे सकाळी अंदाजे तीन वाजता म्हापशाहून पणजीच्या दिशेने येणाऱ्या रोडवरून येणाऱ्या MH 46 H 2442  नंबरच्या भरधाव ट्रकचालकाला अंदाज न आल्याने त्याने पूर्वीच विभाजकावर चढलेल्या ट्रकला ठोकर मारली. वाहने अवजड असल्याने रस्ता क्रेनच्या साहाय्याने रस्ता मोकळा करण्यासाठी जवळपास सकाळचे अकरा वाजले. 

अपघातस्थळी रस्ता अरुंद असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि अपघात घडत असतात. रस्ता रुंदीकरणासाठी टाकलेली खडी ही वाहतूक कोंडीत अधिक भर घालते. रस्ता रुंदीकरणाच्या नावाने खडी टाकून गेलेल्या ठेकेदार गायब असल्याने 20 दिवस वाहनचालकांना त्रासाचे बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav: 21 कोटींचं आलिशान घर, लक्झरी कार कलेक्शन...'सूर्या दादा'ची Net Worth ऐकून चक्रावून जाल

IND vs PAK: भारतानं पाकिस्तानविरूध्दच्या मॅचवर बहिष्कार टाकला तर? गुणतालिकेत उलथापालथ निश्चित, पाकचा राहील वरचष्मा

Viral Video: 'मनोहर पर्रीकर फिरायचे तसे तुम्हीही फिरत जा'; पुण्यात पाहणी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना महिलेचा सल्ला Watch Video

Socorro: मान्सूनच्या आगमनापासून वेगवेगळे रंग धारण करणारे 'सुकूर पठार'

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

SCROLL FOR NEXT