Truck Accident at Verem Dainik Gomantak
गोवा

ब्रेक निकामी झाल्याने मालवाहू ट्रक मंदिरात घुसला

वेरे-बार्देश येथील घटना, मंदिराचं मोठं नुकसान झाल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : ब्रेक निकामी झाल्याने मालवाहू ट्रक मंदिरात घुसल्याची घटना गोव्यात घडली आहे. पणजीजवळीत वेरे परिसरात भरधाव मालवाहू ट्रक मंदिरात घुसला आहे. अपघातात सरस्वती मंदिराचे मोठे नुकसान झालं आहे.

पणजीजवळच (Panjim) असलेल्या वेरे भागात हा मालवाहू ट्रकचा थरार पाहायला मिळाला आहे. भरधाव ट्रकचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने तो एका मंदिरात घुसला. वेरे परिसरातील सरस्वती मंदिराचं या अपघातात मोठं नुकसान झालं आहे. ट्रक मंदिरात (Temple) घुसल्याने वेरे परिसरात एकच गोंधळ उडाला. या अपघातात ट्रकच्या दर्शनी भागाचंही मोठं नुकसान झालं आहे, तर मंदिराच्या एका बाजूचं नुकसान झाल्याचं दिसत आहे. चालकालाही किरकोळ इजा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान रायबंदर बायपास मार्गावर रविवारी रात्री उशिरा सरकारी वाहनाची दोन दुचाकींना धडक बसली. या अपघातात सांताक्रूझ येथील पुष्पलता स्वामी या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुचाकीवरील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या अपघातप्रकरणी (Accident) संबंधित सरकारी वाहनाच्या चालकाला निलंबित करण्यात आले असून त्याने अपघातावेळी मद्यपान केले असल्याची माहितीही आता समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT