Bicholim Accident Dainik Gomantak
गोवा

Bicholim Accident: डिचोलीत भीषण अपघात! कंटेनरच्या धडकेत स्थानिक तरुणाचा मृत्यू; चालक फरार

Bicholim Accident New Youth Dead: तालुक्यातील लाखेरे येथे आज रविवारी (२५ जानेवारी) एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

Sameer Amunekar

डिचोली: तालुक्यातील लाखेरे येथे आज रविवारी (२५ जानेवारी) एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात एका स्थानिक तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातानंतर संबंधित कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाखेरे-डिचोली मार्गावरून हा तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना एका मोठ्या कंटेनरने त्याला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वार तरुण रस्त्यावर फेकला गेला आणि गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

आरोपी चालक फरार

अपघात झाल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कंटेनर चालकाने माणुसकी विसरत तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

तसेच, अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.

डिचोली आणि आसपासच्या भागात अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. भरधाव वेगाने धावणारी ही वाहने निष्पाप लोकांच्या जीवावर बेतत आहेत. या घटनेनंतर लाखेरे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; गॅरेजमध्ये झोपलेल्या 23 वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं VIDEO

Tamborim Verca: तांबोरी-फात्राडे किनाऱ्यावर तणाव! स्‍थानिकांनी राेखली रेतीची वाहतूक; Watch Video

Goan Ghost Stories: पर्वरीत पांढऱ्या वेषातील बाई दिसली, मांडवी पुलावर पोचेपर्यंत त्या भुताने माझा पाठलाग केला; भुतांचे अस्तित्व

Viral Video: जुगाड की वेडेपणा? एक कार अन् 50 प्रवासी! व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले, 'हे भारतातच शक्य'!

Goa Tour Package: गोवा वाले बीच पे...! 'IRCTC' घेऊन आलीय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज, कसं करायचं बुकिंग? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT