Bail hearing of Sunil Goodlar and Mohammad Husain Harihar Dainik Gomantak
गोवा

Sunil Gudlar Case: गुडलरवर यापूर्वीही गंभीर गुन्हे, चौकशीची गरज; ACB चा दावा, जामिनाच्‍या अर्जावर होणार निवाडा

Sunil Gudlar Bail Hearing: अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजया आंब्रे यांच्या न्यायालयात सोमवारी हा जामीन अर्ज सुनावणीस आला असता, सरकार पक्षाने त्याला कडक विरोध केला.

Sameer Panditrao

मडगाव: निलंबित पोलिस निरीक्षक सुनील गुडलर याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे असून त्याची कोठडीत चौकशीची गरज असल्याचे एसीबीने सोमवारी न्यायालयात त्याच्या जामीन अर्जाला विरोध करताना सांगितले. आता गुडलर आणि पोलिस शिपाई मोहम्मद हुसेन हरिहर या दोघांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (ता.२९) रोजी निवाडा होणार आहे.

अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजया आंब्रे यांच्या न्यायालयात सोमवारी हा जामीन अर्ज सुनावणीस आला असता, सरकार पक्षाने त्याला कडक विरोध केला. संशयित साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, सध्या चौकशी सुरू असल्याने, त्याला जामीन देऊ नये, असे सांगण्यात आले. कोकण रेल्वे स्थानकात जे लाच प्रकरण घडले, त्यात हुसेन याचाही समावेश असल्याने त्याच्याही जमीन अर्जाला सरकारी पक्षाने विरोध केला.

बेळगाव येथील एका मटण व्यापाऱ्याला गोव्यात मांस पुरवठा केल्याच्या खोट्या प्रकरणात फसवून त्याच्याकडून दोन लाखांची खंडणी व दरमहा २५ हजार रुपये हफ्त्याची मागणी केल्याप्रकरणी या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी २१ एप्रिल रोजी अटक केली होती. सध्या हे दोघेही ७ दिवसाच्या पोलिस कोठडीत आहे.

३० मार्च रोजी गोवा एक्स्प्रेस रेल्वेने मडगावात आलेले बीफ रेल्वे पोलिसांनी जप्त केले होते. नंतर बेळगाव येथील एका मटण विक्रेत्याला धमकावून त्याच्याकडून खंडणी मागण्याचा प्रकार घडला होता. त्या व्यापाऱ्याने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. नंतर कारवाई करून या संशयितांना अटक केली होती.

जामीन अर्ज विरोध

मोहम्मद हुसेन हा तपासकामात सहकार्य करीत नाही. चौकशीसाठी त्याची कोठडी आवश्यक आहे. साक्षीदाराच्या जबानी घ्यायच्या आहेत. पोलिस शिपाई असल्याने जामीन मिळाल्यास साक्षीदारावर हुसेन दबाव आणू शकतो. तसेच तक्रारीत फेरफार करू शकतो. सबब त्याला जामीन देऊ नये, असे सरकार पक्षाने जमिनीला विरोध करताना न्यायालयात आपले म्हणणे मांडले. जप्त केलेले बीफ प्रकरण मिटविण्यासाठी २५ हजाराचा हफ्ता घेण्यात आला होता. लाच घेतलेली ही रोकड सुनील गुडलर याच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये सापडली होती, असेही म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

SCROLL FOR NEXT