Goa News |
Goa News | Dainik Gomantak
गोवा

Goa News: सेंट झेवियर्स कॉलेजच्या आवारात अभाविपचा गोंधळ

दैनिक गोमन्तक

Goa News: विद्यार्थी मंडळ स्थापन करून अधिकारग्रहण सोहळा करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रतिनिधींनी काल येथील सेंट झेवियर्स कॉलेज प्रशासनास अक्षरशः वेठीस धरत महाविद्यालयाच्या आवारात गोंधळ घातला.

‘अभाविप’ने कॉलेजमध्ये प्रचंड घोषणाबाजी करत तब्बल चार तास धरणे आंदोलन केले. मात्र, हा संवेदनशील विषय हाताळण्यास सरकारी प्रशासनाला झालेला विलंब लक्षात घेता संबंधित यंत्रणेची पुरती नाचक्की झाली.

आंदोलन काळात कॉलेज प्रशासन व ‘अभाविप’च्या प्रतिनिधींमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून घटनास्थळी दंडाधिकारी वर्षा परब, उपअधीक्षक जीवबा दळवी, पोलिस निरीक्षक परेश नाईक तसेच मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात होता. या विषयावर चर्चेसाठी ‘अभाविप’च्या प्रतिनिधींनी प्राचार्यांची भेट मागितली.

मात्र, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने हा विषय अधिक ताणला गेला. परिणामी कॉलेजचे प्राध्यापक व ‘अभाविप’मध्ये संघर्ष झाला. स्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर पोलिसांनी संयुक्त मामलेदार तथा दंडाधिकारी वर्षा परब यांना पाचारण केले. दंडाधिकाऱ्यांनी या संघटनेचे म्हणणे ऐकले व नंतर प्राचार्यांची भेट घेतली.

आमदार फेरेरा यांनी नोंदवला निषेध

हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लोस फेरेरा यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये केलेल्या आंदोलनाचा निषेध नोंदविला. शिक्षण संकुलासारख्या जागेचे पावित्र्य भंग करणाऱ्यांना प्रवेश देऊ नये. राजकीय पक्षाशी संबंध आहे म्हणून शैक्षणिक संकुलात धुडगूस घालण्याचा हक्क कोणालाही नाही.

आम्हाला गोव्यात आणखी एका ‘जेएनयू’ची आवश्यकता नाही. एकमेकांबद्दल द्वेषाची भावना वाढीस लागण्यासारखे हे कृत्य आहे. आम्हाला हे प्रकार नकोत, असे फेरेरा यांनी म्हटले आहे.

हा प्रकार निषेधार्ह : फा. सलेमा

आजची घटना दुर्दैवी आहे. काही गटांनी कॉलेजमध्ये घुसखोरी केली. त्यांनी घोषणाबाजी तसेच व्यवस्थापनाशी गैरवर्तन केले. यात कॉलेजचे तीन विद्यार्थी होते. त्यांनी वर्ग बंद पाडण्याचा प्रयत्न केला. प्रयोगशाळेत प्रात्यक्षिके सुरू होती, तीही बळजबरीने बंद पाडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निषेधार्ह असून कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन कॉलेजचे प्रशासक फा. टोनी सलेमा यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT