Bahraich UP - Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

गोव्यात हल्ला करुन फरार, बहराइचमध्ये सराफा व्यापाऱ्याला भोसकून लुटले; सराईतासह चौघांना अटक

Bahraich UP - Goa Crime News: नानपारा कोतवाली परिसरात एका सराफा व्यापाऱ्याला भोसकून लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या चौघांना बहराइच पोलिसांनी अटक केली.

Pramod Yadav

Bahraich UP - Goa Crime News

नानपारा कोतवाली परिसरात एका सराफा व्यापाऱ्याला भोसकून लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या चौघांना बहराइच पोलिसांनी अटक केली. दरोड्याचा सूत्रधार दिवाण सिंग हा गोव्यात घोटाळा करून माघारी आला होता, त्याने राजस्थानमधील तीन जणांच्या सोबतीने सराफा व्यापाऱ्याला लुटले होते.

पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेले दागिने आणि रोख रक्कम जप्त केलीय. त्यांना अटक करणाऱ्या पोलीस पथकाला वीस हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी, राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील दिवाण सिंग, अंकित कुमावत, कमलेश कुमावत आणि हेमराज नावाच्या चौघांना अटक केली आहे.

नानपारा भागात दुकान बंद करून घरी परतणाऱ्या सराफा व्यापाऱ्यावर दुचाकीवरून आलेल्या तीन दरोडेखोरांनी चाकूने हल्ला करून त्यांच्याकडील लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लुटून पळ काढला होता. 9 फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली होती.

या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाल्यानंतर, या प्रकरणातील संशयितांना पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी विविध पोलीस पथके तयार केली होती.

नानपारा कोतवाली परिसरात अमित सोनी नावाच्या सराफा व्यापाऱ्याची लूट केल्याची घटना 9 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी एका पथकाने एका गुप्तचराला अटक केली होती, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक पवित्र मोहन त्रिपाठी यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये दिवाण सिंग हा सराईत गुन्हेगार असून त्याने काही काळापूर्वी गोव्यात एका व्यक्तीवर हल्ला केला होता, त्यानंतर तो बहराइचला परत आला आणि त्याच्या साथीदारांसह दरोडा टाकला.

पोलिसांनी अटक संशयितांकडून हजारो रुपयांच्या रोकडसह दोन दुचाकी, 6 फोन आणि एक चाकू जप्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT