Abhir and Dia from Goa top in chess Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील अभीर आणि दिया 'बुद्धिबळा'त अव्वल

राज्यस्तरीय 10 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यस्तरीय 10 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत अभीर प्रभू याने खुल्या गटात, तर दिया सावळ हिने मुलींत विजेतेपद प्राप्त केले. बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेने जी. एस. आमोणकर विद्या मंदिर आणि लायन्स क्लब ऑफ थिवी यांच्या सहकार्याने आणि गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीच्या मान्यतेने घेतलेली स्पर्धा म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्या मंदिरात झाली.

खुल्या गटात अभीर प्रभू, शुभ बोरकर, साईराज नार्वेकर यांचे सहा फेऱ्यांतून प्रत्येकी पाच गुण झाले. टायब्रेकर गुणांत अभीर अव्वल ठरला. मुलींत दिया सावळ हिने सर्व पाचही डाव जिंकून प्रथम क्रमांक राखला. चार गुणांसह नव्या नार्वेकर हिला दुसरा क्रमांक मिळाला. दोन्ही गटातील पहिले दोन स्पर्धक राष्ट्रीय 10 वर्षांखालील स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरले आहेत. ही स्पर्धा येत्या 26 एप्रिलपासून जम्मू येथे खेळली जाईल.

खुल्या अभीर, शुभ व साईराज यांच्यानंतर राजवीर पाटील, वेदांत शिरोळे, एकांग मालवणकर यांना अनुक्रमे चौथा ते सहावा क्रमांक मिळाला. मुलींत लिया सिल्वेरा, जेन्सिना सिक्वेरा, तनिशा नाईक देसाई, अवनी सावईकर यांना अनुक्रमे तिसरा ते सहावा क्रमांक प्राप्त झाला. बार्देश तालुका पातळीवर खुल्या गटात रौनक नाईक, आरुष आर्सेकर, मुलींत वेदा केळकर यांना बक्षीस मिळाले.

अरविंद म्हामल स्पर्धेचे मुख्य आर्बिटर, तर अविनाश मालवणकर सहाय्यक आर्बिटर होते. बक्षीस वितरण लायन्स क्लब इंटरनॅशनलचे अध्यक्ष अश्विनीकुमार कर्पे, तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीचे निमंत्रक सचिन आरोलकर, लायन्स क्लबचे जिल्हा अध्यक्ष शिरीष दिवकर, बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विश्वास पिळणकर, सचिव डॉ. सुशांत धुळापकर, खजिनदार रामचंद्र परब, सदस्य गोविंद शिरोडकर यांच्या उपस्थितीत झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT