Goa to Ayodhya Astha Train Dainik Gomantak
गोवा

Goa to Ayodhya Astha Train: गोव्यातून 2,000 रामभक्तांना घेऊन 'आस्था' ट्रेन अयोध्येला रवाना, CM सावंतही देणार भेट

Goa to Ayodhya Astha Train: भारतीय रेल्वेने देशाच्या विविध भागांतील भाविकांना अयोध्येला नेण्यासाठी ‘आस्था स्पेशल’ ट्रेनची घोषणा केलीय.

Pramod Yadav

First Astha train from Goa to Ayodhya

गोव्यातून 2,000 रामभक्तांना घेऊन 'आस्था' विशेष ट्रेन अयोध्येला रवाना झाली. उत्तर गोवा जिल्ह्यातील थिवी रेल्वे स्थानकावर सोमवारी (दि.12) सायंकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे (गोवा) प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि इतर आमदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 15 फेब्रुवारीला राज्यातील सर्व कॅबिनेट मंत्र्यांसह अयोध्येला जाणार असल्याची माहिती यावेळी दिली. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करुन सर्वांचे स्वप्न सत्यात उतरवल्याबद्दल गोव्यातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारी आहे, असे सावंत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारीला राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर मोठ्या संख्येने भाविक अयोध्येला जात आहेत.

भारतीय रेल्वेने देशाच्या विविध भागांतील भाविकांना अयोध्येला नेण्यासाठी ‘आस्था स्पेशल’ ट्रेनची घोषणा केलीय.

देशातील विविध राज्यातून अयोध्येसाठी विशेष ट्रेन रवाना होत आहेत. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर देशभरातील रामभक्तांसाठी आस्था ट्रेन चालवल्या जात आहेत.

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यात देशातील सर्व प्रसिद्ध कलाकार, खेळाडू, नेते, धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातील लोक आणि नामांकीत व्यक्तिमत्व सहभागी झाले होते.

या सोहळ्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना न येण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर देशभरातील नागरिक अयोध्येला भेट देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT