Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दक्षिणेतील उमेदवारीसाठी ‘आप’ची चाचपणी सुरू

Goa Politics: दक्षिणेतील उमेदवारीसाठी ‘आप’ची चाचपणी सुरू

दैनिक गोमन्तक

Goa Politics: इंडिया आघाडीचे भागीदार असलेल्‍या आम आदमी पक्षाने दक्षिण गोव्‍यातील लोकसभा उमेदवारीवर दावा करण्‍याचे जवळपास निश्चित केले असून आम आदमी पक्षाचे राष्‍ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्‍या चालू आठवड्यात होणाऱ्या गाेवा दौऱ्यावेळी त्‍यासंदर्भात चर्चा होण्‍याची शक्‍यता आहे.

दक्षिण गोव्‍याची जागा ‘आप’ला मिळाल्‍यास आम्‍ही निवडणूक लढविण्‍यास तयार आहोत. आमच्‍याकडे उमेदवारही कोण तो ठरला आहे, अशी माहिती ‘आप’चे बाणावलीचे आमदार व्हेझी व्‍हिएगस यांनी दिली.

18, 19 व 20 जानेवारी असे तीन दिवस केजरीवाल गोवा भेटीवर येणार असून या दरम्‍यान ते दक्षिण गोव्‍यातील वेळ्‍ळी आणि बाणावली या मतदारसंघांचा दाैरा करून स्‍थितीचा आढावा घेणार आहेत.

या भेटीत ते दक्षिण गोव्‍यातील मुख्‍य कार्यकर्त्यांशी चर्चा करतील असे सांगण्‍यात येते.

‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना बाणावलीचे आमदार व्हेझी व्‍हिएगश यांनी गोव्‍याच्‍या राजकारणात आम आदमी पक्ष हा एक शिस्‍तबद्ध पक्ष म्‍हणून पुढे येत आहे. त्‍यामुळे लोक या पक्षाकडे एक नवा पर्याय म्‍हणू्न पाहू लागले आहेत. अशा परिस्‍थितीत दक्षिण गोव्‍याची जागा ‘आप’ला दिल्‍यास आम्‍ही येेथे निवडून येऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT