Valmiki Naik Aap X
गोवा

Goa AAP: ..तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही! Cash For Job वरुन 'आप' कार्याध्यक्षांचा इशारा

Goa Government Job Fraud: सत्ताधाऱ्यांनी कितीही स्पष्टीकरण दिले तरी जोपर्यंत सरकार या प्रकरणी स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करत नाही. या प्रकरणात कोण गुंतलेत हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,असा इशारा ‘आप’चे कार्याध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa AAP Protest Against Cash For Job

पणजी: राज्यात मागील काही दिवसांपासून नोकरी घोटाळा गाजत आहे. परंतु ज्यांना पकडले आहे, ते छोटे मासे असून यात सत्ताधारी पक्षातील अनेकजण गुंतलेले आहेत. सत्ताधाऱ्यांनी यासंबंधी कितीही स्पष्टीकरण दिले तरी जोपर्यंत सरकार या प्रकरणी स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करत नाही. या प्रकरणात कोण गुंतलेत हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,असा इशारा ‘आप’चे कार्याध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी दिला.

ते ‘आप’ युवा समितीतर्फे नोकरी घोटळ्याविरोधात कुजिरा येथे आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात बोलत होते. यावेळी ‘आप’ युवा समितीचे रोहन नाईक, सलमान खान व इतर उपस्थित होते. दरम्यान नाईक म्हणाले, राज्यातील सरकार आपण किती स्वच्छ आहोत हे पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देत आहे. परंतु जो पर्यंत मागील दहा वर्षांत कुणाचे सरकार आहे आणि ते कशा प्रकारे काम करत आहे हे सर्व जनता पाहत आहे. त्यामुळे ‘टोकरी फॉर नोकरी’ बंद होणे गरजेचे आहे.

नोकरीला पैसा द्यावा लागतो; ही शोकांतिका!

ज्यावेळी जनता एखाद्या सरकाराला निवडून देते. त्यावेळी ते सरकार जनतेचे भलं करेल, अशी अपेक्षा असते. मोठ्या प्रमाणात विकास होईल रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे वाटते. परंतु जर नोकरी मिळविण्यासाठी जनतेला आपल्या जमिनी विकून, दागिने, घर गहाण टाकून कर्ज काढून पैसे देऊन जर सरकारी नोकरी मिळवावी लागत असेल, तर त्याच्या इतकी शोकांतिका नाही, असे सलमान खान यांनी सांगितले.

...तर शिक्षणाचा काय फायदा?

जर पैसे भरून सरकारी नोकरी मिळवावी लागत असेल तर आमच्या शिक्षणाचा काय लाभ? जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला चांगले नेतृत्त्व निवडून द्यावे लागेल. नागरिकांनी चांगल्या व्यक्तींना निवडले नाही तर ही परिस्थिती बदलणार नाही. सरकारने नोकरी घोटाळ्याविषयी तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मते उपस्थितांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT