ED Dainik Gomantak
गोवा

Goa AAP: मोठी बातमी! 'आप'ने गोवा निवडणुकीत दिल्ली दारू घोटाळ्याचा पैसा वापरला, ED चा आरोप

गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दोन आमदार निवडून आले आहेत.

Pramod Yadav

आम आदमी पक्षाने कथित दिल्ली दारू घोटाळ्याचा पैसा गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी वापरला. असे अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. 'निधीचा काही भाग 'आप'च्या निवडणूक प्रचारात वापरण्यात आला होता.' असे तपासात दिसून आल्याचे ईडीने म्हटले आहे.

गोवा विधानसभा निवडणूकीत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने संपूर्ण ताकद लावली. प्रचारात मोठा पैसा देखील खर्च करण्यात आला. निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दोन आमदार निवडून आले आहेत.

(AAP used Delhi liquor scam money to fund Goa polls campaign, says ED)

आम आदमी पक्षाच्या सर्वेक्षण टीममधील काही स्वयंसेवकांना तब्बल 70 लाख रूपये रोखड स्वरूपात दिले आहेत. प्रचारात सहभागी असलेल्या काही लोकांकडे हे पैसे दिले जायचे अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते विजय नायर यांनी ED ला दिली आहे.

दरम्यान, गोवा विधानसभा निवडणूकीत (Goa Assembly elections) विविध पक्षांनी केलेल्या खर्चाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात दुसऱ्यांदा गोवा विधानसभा लढविणाऱ्या आपने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 3.5 कोटी रूपये एवढा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

कोणी किती रूपये केले खर्च?

तृणमूल काँग्रेसने गोवा निवडणूकीसाठी सर्वाधिक 47.54 कोटी रूपये खर्च केले आहेत. त्याखालोखाल राज्यात आज सरकार असलेल्या भारतीय जनता पक्षाने 17.75 कोटी रूपये खर्च केले.

तसेच, काँग्रेसने (Congress) तब्बल 12 कोटी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) 25 लाख रूपये आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (Uddhav Thackray Shivsena) गोवा निडणूकीसाठी 92 लाख रूपये खर्च केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT