Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

अगोदर राज्यातील ऐतिहासिक दस्‍तावेज सांभाळा : आप

पुराभिलेख मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर टीका

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्‍यातील ऐतिहासिक दस्‍ताऐवजांची निगा राखा. मगच पोर्तुगालमधील गोव्‍याच्‍या संबंधित ऐतिहास दस्‍ताऐवज आणण्याच्‍या गप्पा मारा, अशी टीका आम आदमी पक्षाने केली असून, पुराभिलेख मंत्री सुभाष फळदेसाई यांच्‍यावर त्यांनी आरोप केले. गोव्‍याचा वैभवशाली इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी पोर्तुगाल सरकारकडून ऐतिहासिक दस्‍ताऐवज आणले जातील, असे वक्‍तव्‍य मंत्री फळदेसाई यांनी नुकतेच केले होते. यावर आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी टीका केली.

1959 मध्ये राज्‍यात अभिलेखागार आणि पुरातत्त्व संचालनालय स्‍थापन करण्यात आले आहे. गोव्‍यातील पुरातत्त्व संचालनालय देशातील पहिले संचालनालय आहे. मंत्री फळदेसाई यांनी ऐतिहासिक दस्‍ताऐवज आणण्यासाठी पोर्तुगालला धाव घेण्याऐवजी राज्‍यातील अभिलेखागार इमारतीची स्‍थिती पाहावी. या ठिकाणी अनेक शतकांपूर्वीचे ऐतिहासिक दस्‍ताऐवज आहेत. मंत्री फळदेसाई यांनी अगोदर पुरातत्त्व खात्‍याच्‍या इमारतीची आणि येथील दस्‍ताऐवजांची काळजी घ्यावी, असा सल्लाही ॲड. पालेकर यांनी दिला.

ही इमारत असलेल्‍या परिसरात दर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठते. ओलसरपणामुळे येथील अमूल्य दस्‍ताऐवजांना धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात बहुतांशवेळा रेकॉर्ड विभाग बंद ठेवावा लागतो. मंत्र्यांनी याचे जतन करणे आवश्‍यक असल्‍याचे ते म्‍हणाले.

सुनील सिग्नापूरकर म्‍हणाले, गोव्यात सध्या असलेला पुरातन वारसा जतन करण्याविषयी मंत्री फळदेसाई अनभिज्ञ आहेत. पोर्तुर्गाल दौरा वारसा समृद्ध करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला नाही. करदात्यांच्या पैशांतून मजा मारण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन केले आहे, अशी टीका सिग्नापूरकर यांनी केली.

अपयश लपविण्यासाठी ‘नको तो विषय’

पोर्तुगालमधील दस्ताऐवज आणखी रहस्ये उघड करू शकतात, असे विधान मंत्री फळदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यावर टीका करताना आपचे प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले, भाजपची तथाकथित ''गोवा फाइल्स'' रणनीती गोमंतकीयांच्या एकीपुढे अयशस्वी ठरली आहे. यामुळे राज्‍य सरकार आता नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्‍न करत आहे. सरकारचे अपयश लपविण्यासाठी नको तो विषय पोखरून काढला जात असल्‍याचे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT