Prashant Naik AAP Goa BITS Pilani Dainik Gomantak
गोवा

BITS Pilani: 'बिट्‌स पिलानी' बिर्लाची संस्‍था असल्‍यामुळेच सरकारचे गैरकृत्‍यांकडे दुर्लक्ष, तज्‍ज्ञ समितीतर्फे चौकशी करा; 'आप'ची मागणी

Prashant Naik AAP Goa BITS Pilani: ‘बिट्‌स पिलानी’ ही बिर्ला कंपनीची शैक्षणिक संस्‍था असल्‍यामुळेच तिला भाजप सरकारचा वरदहस्‍त आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

BITS Pilani Controversy : ‘बिट्‌स पिलानी’ ही बिर्ला कंपनीची शैक्षणिक संस्‍था असल्‍यामुळेच तिला भाजप सरकारचा वरदहस्‍त आहे. त्‍यामुळेच तेथे घडणाऱ्या गोष्‍टींकडे केंद्र व गोव्‍यातील भाजप सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे राज्‍य सचिव प्रशांत नाईक यांनी केला आहे.

या संस्‍थेत विद्यार्थी मृत्‍यूच्‍या दुर्घटना का घडतात, याची सखोल चौकशी करण्‍यासाठी तीन तज्‍ज्ञांची एक समिती स्‍थापन करून सरकारने त्‍वरित चौकशी करावी आणि त्‍यात संस्‍था दोषी आढळल्‍यास कडक कारवाई करावी अशी मागणी नाईक यांनी केली.

मागच्‍या वर्षी सप्‍टेंबर महिन्‍यात ऋषी नायर या विद्यार्थ्याचा मृत्‍यू झाल्‍यानंतर ‘आप’चे वेळ्‍ळीचे आमदार क्रुझ सिल्‍वा यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली होती. ‘बिट्‌स’च्‍या आवारात ड्रग्‍सचा सुळसुळाट झाला असून ऋषी नायर याच्‍या व्‍हिसेरातही ड्रग्‍सचे अंश सापडले होते, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले.

फौजदारी गुन्हा नोंदवा

‘बिट्स पिलानी’ व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले आहेत असा दावा एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने केला असून फौजदारी गुन्हा नोंद करण्‍याची मागणी केली आहे. या आशयाचे निवेदन त्यांनी आज मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना सादर केले. या प्रकरणांची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून करावी. जोपर्यंत सुरक्षा सुविधा जागेवर पडत नाहीत, तोपर्यंत सर्व वर्ग बंद ठेवण्यात यावेत अशी मागणीही संघटनेने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT