Arvind Kejriwal Goa visit Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejriwal Goa: 'जनतेचा भाजप, काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे'! अरविंद केजरीवालनी केला दावा; ‘आप’च्या बैठकांसाठी गोव्यात दाखल

AAP organizational meetings Goa: आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी (ता.३) रात्री ९.१० मिनिटांनी गोव्यात दाखल झाले.

Sameer Panditrao

पणजी: आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी (ता.३) रात्री ९.१० मिनिटांनी गोव्यात दाखल झाले. शुक्रवार ३ ते रविवार ५ ऑक्टोबर असे तीन दिवस त्यांचा गोवा दौरा राहणार आहे. दाबोळी विमानतळावर त्यांचे गोवा प्रभारी आतिषी, गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर, आमदार व्हेन्झी व्हिएगस, आमदार क्रूझ सिल्वा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

केजरीवाल यांचा हा तीन दिवसांचा दौरा पक्षाच्या संघटनात्मक बैठका आणि नवीन कार्यालयाच्या उद्‌घाटनावर केंद्रीत असणार आहे. शनिवार, ४ रोजी सकाळी ११ वा. ते मये येथील कार्यालयाचे उद्‌घाटन करतील.

दुपारी ३.३० वा. दक्षिण गोव्यातील स्वयंसेवकांबरोबर कुडतरी येथे बैठक होईल. रविवार, ५ रोजी दुपारी ३.३० वा. उत्तर गोव्यातील स्वयंसेवकांबरोबर केजरीवालांची म्हापसा येथे बैठक होईल. या तीन दिवसांच्या दौऱ्यात केजरीवाल हे पक्षाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक तयारीचा आढावा घेतील. दरम्यान, काँग्रेसचे अमित पाटकर, गिरीश चोडणकर यांनी ‘आप’वर टीका केली.

राज्यातील जनतेचा भाजप आणि काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे. दोन्ही पक्षांकडून राज्यातील जनतेला अजिबात आशा राहिलेल्या नाहीत. केवळ आम आदमी पक्षाकडून त्यांना आशा आहेत, त्यामुळे २०२७ मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

- अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय संयोजक, आम आदमी पक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'च्या न्यायासाठी पणजीत काढलेला मोर्चा अवैध असल्याचा आरोप; युरी आलेमाव, विजय सरदेसाई यांच्यासह 450 जणांविरोधात गुन्हा

Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

Goa Coconut Price: नारळ अजून महागच! टोमॅटो, कांदाही भडकला; वाचा ताजे दर

Goa News Live: ओपा प्रकल्पातील पंप अखेर सुरु, राजधानीला मिळणार पाणी

Zilla Panchayat Election: गोवा फॉरवर्ड, ‘आप’कडून जोर, काँग्रेस स्‍वस्‍थच! जिल्‍हा पंचायत निवडणूक; सरदेसाईंकडून उमेदवार चाचपणी

SCROLL FOR NEXT