Prashant Naik Dainik Gomantak
गोवा

सत्तेत आल्यावर चांदर येथे 20 बेडचे हॉस्पिटल उभारु, आपचं आश्वासन

मतदारसंघातील लोकांना फसवण्याचे काम माजी आमदारांनी केले असून या मतदारसंघातील लोक मूलभूत सुविधापाऊन वंचित

दैनिक गोमन्तक

केपे : कुंकळी मतदारसंघाचा कोणताच विकास झाला नसून, जर येत्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) लोकांनी आपल्याला निवडून दिले तर, चांदर येथे वीस खाटांचे सुसज्ज असे हॉस्पिटल उभारणार असल्याचे आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) उमेदवार प्रशांत नाईक यांनी सांगितले. ते कोटा चांदर येथे परिवर्तन यात्रेत बोलत होते.

प्रशांत नाईक (Prashant Naik) यांनी कुंकळी मतदारसंघात आपले प्रचारकार्य जोरात सुरू केले असून त्यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. कुंकळी मतदारसंघातील लोकांना फसवण्याचे काम माजी आमदारांनी केले असून या मतदारसंघातील लोक मूलभूत सुविधापाऊन वंचित असल्याचे त्यांनी सांगितले.

आम आदमी पक्षाला लोकांनी पाठिंबा देऊन राज्यात एक क्रांती घडवून अणूया अशी हाक यावेळी नाईक यांनी मारली.आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला निवडून देऊन लोकांनी भ्रष्टाचारमुक्त सरकार घडविण्यास सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले. गेल्या दीड महिन्यापासून सर्वात आधी कुंकळी मतदारसंघात त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

कुंकळीतून सध्या आमदार क्लाफासीओ डायस, युरी आलेमाव, संतोष फळदेसाई व डॉ. जोरसोन फेर्नांडिस निवडणूक लढवणार आहेत. आमदार क्लाफासीओ यांनी सरकार तुमच्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करून प्रचाराला सुरुवात केली होती तर युरी यांनी कोपरा बैठका घेण्यावर भर दिला आहे. त्यात नवीनच राज्यात आलेल्या त्रिणूमुल काँग्रेसमध्ये दाखल झालेले जोरसोन यांनीही जाहीर बैठका घेऊन मैदानात उडी मारली आहे.संतोष फळदेसाई हे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले असून आपण घरोघरी प्रचारावर भर दिला आहे असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT