AAP Goa Dainik Gomantak
गोवा

AAP Goa: आतिशींकडे पुन्हा राज्य प्रभारीपद, आम आदमी पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा

Goa Assembly Election: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर तळागाळात पक्ष बळकट करण्यासाठी आम आदमी पक्षाने आपल्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर तळागाळात पक्ष बळकट करण्यासाठी आम आदमी पक्षाने आपल्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. आतिशी यांची पुन्हा एकदा गोवा राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नवीन नियुक्त्यांमधून मजबूत संघटन उभारणे, स्थानिक नेतृत्वाला सक्षम करणे आणि संपूर्ण गोव्यात पक्षाचा विस्तार करणे यावर पक्षाची कटिबद्धता असल्याचे दिसून येते. ही टीम लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि मतदारसंघ पातळीवर नागरिकांशी अधिक घनिष्ठ संपर्क साधण्यासाठी काम करणार आहे.

नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये मॅन्युएल सिमाओ कार्डोझो (राज्य उपाध्यक्ष), अमित जोग (राज्य उपाध्यक्ष), ॲड. जेनिफा डायस (सदस्य, कायदेशीर कक्ष), दुर्वा पेडणेकर (अध्यक्ष, युवा आघाडी, उत्तर गोवा), तेजस्विनी गावकर (अध्यक्ष, युवा आघाडी, कुशावती) आणि संजवी वेळीप (अध्यक्ष, महिला आघाडी - कुशावती).

रतिश्मा शिरोडकर (उपाध्यक्ष, महिला आघाडी -उत्तर गोवा), सरिता पणजीकर (उपाध्यक्ष, महिला आघाडी-दक्षिण गोवा), मिनू गावडे (अध्यक्ष, एसटी आघाडी-दक्षिण गोवा), गीतेश नाईक (विधानसभा अध्यक्ष, फोंडा), सांताना डायस (संघटन सचिव, फोंडा), आतिशी (गोवा राज्य प्रभारी) वाल्मिकी नाईक (अध्यक्ष-‘आप'' गोवा) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नोकरीत बढती अन् तगडा आर्थिक लाभ! आजचा शुक्रवार ठरवणार तुमचे नशीब; कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ?

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

SCROLL FOR NEXT