Edberg Pereira Assault Case Dainik Gomantak
गोवा

Edberg Pereira Assault Case: शिरवईकरला बडतर्फ करून अटक करा, 'आप'ची मागणी; मारहाणीत जखमी एडबर्गची प्रकृती गंभीरच

edberg pereira case goa: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर याला सेवेतून बडतर्फ करा.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव : एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर याला सेवेतून बडतर्फ करा. तसेच त्‍याला‍ व त्‍याच्‍या साथीदार पोलिसांना खुनाचा प्रयत्‍न केल्‍याच्‍या आरोपाखाली अटक करा, अशी मागणी ‘आप’चे गोवा अध्‍यक्ष अमित पालेकर यांनी केली आहे.

तसेच या प्रकरणी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा हे आपल्‍या कर्मचाऱ्यांना वाचवण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत, असा आरोपही केला. दरम्‍यान, गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनीही नीलेश शिरवईकरच्‍या बडतर्फीची मागणी लावून धरली आहे.

२२ ऑक्‍टोबर रोजी मडगाव पोलिस कोठडीत हा मारहाणीचा प्रकार घडला होता. त्‍यामुळे एडबर्ग परेरा याच्‍या डोक्‍याला गंभीर मार बसला आहे. काल गोमेकॉत त्‍याच्‍यावर शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. त्‍याची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच त्‍याच्‍या मेंदूतून रक्तस्राव झाल्‍यामुळे त्‍याला कायमस्वरूपी अपंगत्‍व येण्‍याची भीतीही व्‍यक्‍त केली जात आहे.

डीजीपींना घेराव घालणार : काँग्रेस

या प्रकरणाची चौकशी ‘एसआयटी’मार्फत करावी. तसेच दोषींवर तत्‍काळ कारवाई करावी, अन्‍यथा पोलिस महासंचालकांना घेराव घालू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. पोलिस महासंचालक अलोक कुमार यांना मागण्‍यांचे निवेदन सादर केल्‍यानंतर प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्‍यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍था किती ढासळली आहे हे या घटनेने स्‍पष्‍टपणे दिसून येते.

प्रकरण दडपण्‍यासाठी ३ लाखांची ऑफर!

एडबर्ग परेरा याच्‍या कुटुंबीयांनी हे प्रकरण लावून धरू नये यासाठी पोलिसांकडून त्‍याच्‍या मावशीला तीन लाख रुपयांची ऑफर देण्‍यात आली होती, असा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्‍हो यांनी केला आहे. हा प्रकार गंभीर असतानाही पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा हे त्‍यावर पांघरूण घालण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. त्‍यामुळे आता त्‍यांचीही चौकशी करण्‍याची गरज आहे, असे कुतिन्‍हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘जिंदा काट दूंगा’, चाकू काढून दिली धमकी! भररस्‍त्‍यावर गुंडांकडून विनयभंग, मारहाण; महिलेसह कुटुंबावर हल्ला; चौघांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या

Goa Nightclub Fire: बर्च अग्नितांडव प्रकरणी 15 अधिकाऱ्यांवर ‘बडगा’! सरपंच, पंचायत सचिवांवरही टांगती तलवार

Horoscope: वर्षाचा शेवट सुखाचा आणि नवा संकल्प! 'या' राशींचे भाग्य उजळणार, वाचा तुमचे भविष्य

म्हापशात 'रेंट-अ-बाईक' चालकांमध्ये थरार! वादातून एकाने दुसऱ्याचा कानच तोडला; भररस्त्यातील रक्तापाताने हादरले नागरिक

IND-W vs SL-W: शेफाली-ऋचा अपयशी, पण हरमनप्रीत चमकली! चौकार-षटकारांचा पाडला पाऊस; झंझावती खेळीने सावरला टीम इंडियाचा डाव VIDEO

SCROLL FOR NEXT