Goa AAP Dainik Gomantak
गोवा

Goa AAP: 'आप'चा मास्टरस्ट्रोक! दिल्ली प्रदेशाध्यक्षासह नव्या प्रभारींची केली नियुक्ती, गोव्याची जबाबदारी कोणाकडे?

Aam Aadmi Party: दिल्ली विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आम आदमी पक्ष (AAP) खडबडून जागा झाला आहे.

Sameer Amunekar

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आम आदमी पक्ष (AAP) खडबडून जागा झाला आहे. पक्षाच्या रणनीतीत मोठे बदल करण्याच्या तयारीत असलेल्या 'आप'ने शुक्रवारी (२१ मार्च) गोवा, गुजरात आणि पंजाब या महत्त्वाच्या राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आप पक्षात फेरबदलांची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या संघटनेत बदल करण्यात आले आहेत.

या बैठकीला संघटनेचे सरचिटणीस संदीप पाठक, मनीष सिसोदिया, गोपाल राय, माजी मुख्यमंत्री आतिशी, आमदार इम्रान हुसेन, पंकज गुप्ता, खासदार एनडी गुप्ता आणि राघव चढ्ढा उपस्थित होते.

माजी आमदार सौरभ भारद्वाज यांची दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय. त्यांनी माजी मंत्री गोपाळ राय यांची जागा घेतली आहे. गोपाळ राय यांना पक्षानं गुजरातचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

गोव्याची जबाबदारी कोणाकडे?

गोव्याची जबाबदारी पुन्हा दुर्गेश पाठक यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता होती, मात्र पंकज गुप्ता यांना गोव्याचे प्रभारी बनवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दुसरीकडे, राज्यसभा खासदार संदीप पाठक यांना छत्तीसगडचे प्रभारी बनवण्यात आलं आहे.

मनीष सिसोदियांकडे पंजाबची कमान

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आम आदमी पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना पंजाब राज्याचे प्रभारी बनवण्यात आलं आहे. पंजाबमध्ये 'आप' सरकारच्या कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी सिसोदिया यांचा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे.

याशिवाय, माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची पंजाबच्या उपप्रभारी पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. सत्येंद्र जैन यांचा प्रशासकीय अनुभव देखील आपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

आगामी निवडणुकीसाठी रणनीती

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आल्यानं, पक्षाच्या संघटनेत बदल होण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती. पक्षाच्या नव्या डावामुळं आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येत आहे.

आम आदमी पक्षाने मोठे फेरबदल करत विविध राज्यांसाठी नवे प्रभारी नियुक्त केले आहेत. या बदलांमुळे पक्ष पंजाबसह गुजरात, गोवा आणि छत्तीसगडमध्ये संघटन मजबूत करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्ष काँग्रेस आणि भाजपला मोठे आव्हान देऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT