Baina  Dainik Gomantak
गोवा

Baina : पुरोहीत मारहाण प्रकरणी आम. कृष्णा साळकर यांनी घेतली डीवायएसपींची भेट

मारुती मंदिराच्या पुजाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ साळकर यांनी कडक कारवाई करण्याचा मागणी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को बायणा समुद्र किनाऱ्यावर असलेल्या श्री संकट मोचन हनुमान मंदिरात पुरोहीत व अन्य सेवकांना झालेल्या मारहाण प्रकरणी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी समर्थकांसह डीवायएसपींची भेट घेतलीय. मारुती मंदिराच्या पुजाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ साळकर यांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी ही विश्व हिंदू परिषदेने वास्को बायणा समुद्र किनाऱ्यावर असलेल्या श्री संकट मोचन हनुमान मंदिरात पुरोहीत व अन्य सेवकांना झालेल्या मारहाण प्रकरणी तपासात पोलिसांच्या वेळकाढू धोरणावर त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली होती. तसेच मारहाण प्रकरणी संशयितांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन पुरोहित ब्राह्मण संघ गोवा प्रदेशतर्फेही मूरगाव पोलिसांना देण्यात आले होते.

तरीही काही प्रमाणात पोलिसांकडून वेळ काढूपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी समर्थकांसह डीवायएसपींची भेट घेतलीय. पोलिस अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य ती करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT