प्रेमानंद (बाबू) नानोस्कर Dainik Gomantak
गोवा

आम आदमी पक्षाचे कार्य सर्वांपर्यंत पोहचविणार: प्रेमानंद नानोस्कर

दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री (CM) अरविंद केजरीवाल यांचे मार्गदर्शन गोव्यातील आपच्या कार्यकर्त्यांना प्राप्त होणार आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: दाबोळी मतदार संघातून आम आदमी पक्षाचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा नेता प्रेमानंद (बाबू) नानोस्कर याने कंबर कसली आहे. आप पक्षात प्रवेश केल्यानंतर नानोस्कर जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुद्धा नानोस्करांनी सुरू केला असून लवकरच दाबोळी व नवेवाडे भागात दोन आम आदमी पक्षाची कार्यालये सुरू करणार असल्याची माहिती आपचे नेते प्रेमानंद नानोस्कर यांनी दिली.

दाबोळी येथील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत (Election) पक्षाचा धुरा सांभाळणारे प्रेमानंद नानोस्कर यांनी पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे. नानोस्कर यांनी आपमध्ये प्रवेश करताच त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे.

सध्या नानोस्कर यांचे नवेवाडे, वाडे, चाफेरान, आदर्श नगर, चिखली, आपल्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांना भेटण्याचे सत्र सुरू केले आहे. यात नानोस्करांना चांगला प्रतिसाद लाभला आहे. नानोस्करर यांनी गेल्या दोन दिवसापासून कोपरा बैठका व निवडणुकीची व्युव्हरचनावर भर दिला आहे. आप पक्षाचे कार्य दाबोळीत सुरू झाले असून लवकरच पुढील कार्याला सुरुवात करण्याचे ध्येय नानोस्कर यांनी रचले आहे.

आम आदमी पक्षाचे (AAP) कार्य दाबोळीतून योग्यरीत्या सुरू करण्यासाठी लवकरच प्रेमानंद नानोस्कर नवेवाडे परिसरा बरोबर दाबोळीत इतर कार्यालये सुरू करणार आहे. तसेच पक्षाला बळकटी देण्यासाठी गट समित्या स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दाबोळीत या पक्षाने निस्वार्थी सेवा देण्याचे ठरवले असून नानोस्कर यांना अवश्य लाभ प्राप्त होणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यातर्फे सांगण्यात येत आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री (CM) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे मार्गदर्शन गोव्यातील आपच्या कार्यकर्त्यांना प्राप्त होणार आहे. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली मुरगाव तालुक्यातील दाबोळी आम आदमी पक्षाचे नेते प्रेमानंद नानोस्कर कार्य पुढे घेऊन जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT