Aam Aadmi Party will not form an alliance with Trinamool Congress in Goa  Dainik Gomantak
गोवा

आम आदमी पार्टी गोव्यात तृणमूल सोबत युती करणार नाही

आप गोव्यात चांगले उमेदवार उभे करेल, गोवेकरांना एक नवा पर्याय देईल

दैनिक गोमन्तक

गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष (AAP) ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) सोबत युती करणार नाही, असे आम आदमी पक्षाने (AAP) आज रविवारी सांगितले. गोव्यात पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. आम आदमी पक्षाच्या गोवा प्रभारी आतिशी म्हणाल्या की, "आप गोव्यात चांगले उमेदवार उभे करेल, गोवेकरांना एक नवा पर्याय देईल आणि एक प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करेल."

आतिशी यांनी ट्विट करून हि माहिती दिली “मी पूर्ण जबाबदारीने सांगत आहे की गोव्यात टीएमसीसोबत युती होणार नाही. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा प्रश्नच येत नाही. नवीन पर्याय देण्यासाठी आणि चांगल्या उमेदवारांसह गोव्यात भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत," अशा आशयाचे ट्विट आतिशी यांनी आज केले.

त्यांनी पश्चिम बंगालमधील एका लेखकाच्या ट्विटला दिलेले हे प्रतिउत्तर होते, ज्याने एका बातमीचा हवाला दिला होता की, आप गोव्यात टीएमसीसोबत युती करण्यास उत्सुक आहे आणि ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने अद्याप या प्रस्तावावर निर्णय घेतलेला नाही, परंतु चर्चेची फेरी झाली आहे. या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये आधीच चर्चा झाली आहे. असे त्या लेखकाचे म्हणणे होते.

मात्र 'आप'ने गोवा विधानसभा निवडणूक एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने 2017 मध्येही गोवा विधानसभेची निवडणूकही लढवली होती, परंतु पक्षाला एकही जागा मिळाली नाही. मात्र यावर्षी आपने गोव्यात पुर्ण ताकद लावली आहे. आणि अनेक आश्वासनांना पुर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT