Aam Aadmi Party : गोव्यातील आम आदमी पक्षाला राज्य पक्ष म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने याविषयाची अधिकृत अधिसूचना काढल्याचे पक्षाचे गोवा प्रभारी आणि दिल्लीच्या आमदार आतिशी यांनी कळविली आहे.
आपची 2012 मध्ये स्थापना झाल्यापासून गोवा युनिट सक्रियपणे कार्यरत आहे. पक्षाच्या यशाबद्दल स्थानिक नेते आणि स्वयंसेवकांचे आतिशी यांनी अभिनंदन केले आहे. येथील जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या प्रामाणिक राजकारणाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत पक्षीय कामगिरीत सुधारणा झाल्याबद्दल, आम्ही गोव्यातील जनतेचे आभारी आहोत. गोव्याची अस्मिता, संस्कृती आणि पर्यावरण वाचवण्यासाठी जनेतेने आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडू, असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
आयोगाच्या सुचनेतून राज्यासाठी आणखी कठोर परिश्रमाची प्रेरणा मिळाली आहे. गोव्यातील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पक्षाचे वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा आणि बाणावलीचे कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांनी चांगली कामगिरी केली आहे. गोव्यात पुढील काळात आपचे सरकार स्थापन करण्यासाठी नक्कीच जनता संधी देईल, त्यासाठी आम्ही परिश्रम घेण्यासाठी तयार आहोत, असं आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी म्हटलं आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.