Fatorda Press Conference MLA Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Fatorda News: छत्रपती शिवरायांची बदनामी केल्‍याच्‍या संशयावरून युवकाला मारहाण

गोमन्तक डिजिटल टीम

फातोर्ड्यातील नॉर्बट डायस या युवकाच्‍या इन्‍स्‍टाग्रामवर पेज मॉर्फ करून त्‍यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्‍याचा प्रकार घडला असून यामुळे डायस याला एका जमावाकडून नाहक मारहाण झाल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनीही त्‍या युवकाची कैफियत ऐकून न घेता उलट त्‍याला मारहाण केली, असा आरोप या युवकाच्‍या कुटुंबीयांनी केला आहे.

आज विजय सरदेसाई यांच्‍याबरोबर नॉर्बट डायस व त्‍याच्‍या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन कैफियत मांडली.

कुणीतरी आपले इन्‍स्‍टाग्राम पेज मॉर्फ करून हा मजकूर समाज माध्‍यमावर टाकल्‍याचे आपल्‍या लक्षात आल्‍यावर आपण पोलिस तक्रारीसाठी बाहेर पडत असताना काहीजण आपण आर्लेम येथे काम करत असलेल्‍या गॅरेजजवळ आले आणि त्‍यांनी मारहाण केली. फातोर्डा पोलिस स्‍थानकाबाहेरही मारहाण केली.

हे प्रकार मुद्दामहून केले जात आहेत !

दरम्‍यान, हे असले प्रकार अल्‍पसंख्‍यांक समाजातील लाेकांसंदर्भात द्वेष पसरविण्‍यासाठी मुद्दामहून केले जात आहेत, असे संदेश पसरवून धार्मिक कलह निर्माण करण्‍याचा हा प्रयत्‍न असून पोलिसांनी याबाबत कडक कारवाई करावी,असे विजय सरदेसाई यांनी सांगितले. डायसला मुद्दाम कुणीतरी गुंतविण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. कारवाई न झाल्यास विधानसभेत आवाज उठवू, असा इशारा त्‍यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT