Bicholim Crime Dainik Gomantak
गोवा

Bicholim Crime: गहाळ की चोरी! डिचोलीत महिलेचे सात लाखांचे दागिने गायब; पोलिस तपास सुरु

Bicholim Crime News: एका मध्यमवर्गीय महिलेच्या बॅगेतील सुमारे सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब होण्याची घटना घडली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: एका मध्यमवर्गीय महिलेच्या बॅगेतील सुमारे सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब होण्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संबंधित महिलेला मोठा धक्का बसला आहे. डिचोली बाजारात हा प्रकार घडल्याची शक्यता संबंधित महिला आणि तिच्या पतीने व्यक्त केली आहे.

डिचोलीहून (Bicholim) उसगाव येथे पोहोचल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे. याप्रकरणी महिलेने डिचोली पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिस तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या दागिन्यांची चोरी झालीय, की ते गहाळ झालेत, त्याबाबत निश्चित माहिती उघड झालेली नाही.

यासंबंधीची माहिती अशी, हातुर्ली-मये येथील रिया आणि तिचे पती रूपेश चोपडेकर हे उसगाव येथील एका नातेवाईकाच्या घरगुती सोहळ्याला गेले होते. रिया या डिचोली बाजारातील दोन दुकानांत गेल्या होत्या. दुकानात जाईपर्यंत सोन्याचे (Gold) दागिने असलेली ‘पर्स’ बॅगेत होती. नंतर उसगावला पोहोचल्यानंतर दागिने असलेली पर्स बॅगेत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोन्याचे दागिने हरवल्याने रिया यांना मोठा धक्का बसला असून, हे दागिने कधी मिळतील, याच्या प्रतीक्षेत त्या आहेत.

दरम्यान, सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घराच्या बाहेर पडताना महिलांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT