elected as THE CHAIRMAN OF GOA HAJ COMMITTEE Urfan Mulla Dainik Gomantak
गोवा

येत्या वर्षभरात सुसज्ज हज भवन उभारणार; मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

मडगावात हज समितीसाठी कार्यालय

दैनिक गोमन्तक डिजिटल

हज यात्रेकरूंच्या सोईसाठी येत्या वर्षअखेर गोव्यात सुसज्ज असे हज भवन उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हज समितीच्या बैठकीत दिल्याची माहिती गोवा हज समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला यांनी दिली.

मुख्यमंत्री सावंत यांच्या पणजी येथील शासकीय निवासस्थानी या नवीन समितीची पहिली बैठक झाली. मुख्यमंत्री स्वतः या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

हज समितीसाठी मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय संकुलात सुसज्ज असे कार्यालय देण्याबरोबरच अल्पसंख्याकांसाठी असलेल्या सर्व योजनांची कार्यवाही या कार्यालयातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हज यात्रेला गोव्यातून 200 यात्री जातात. गोवा ते सौदी अरेबिया असे थेट विमान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय अल्पसंख्याक विकास खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

तसेच हज यात्रेसाठी अर्थसंकल्पात 30 लाखांची तरतूद केली आहे, ती 1कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती मुल्ला यांनी दिली. मुल्ला यांची हज समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनीही अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT