Sankhlim Municipality Election 2023 Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Elections 2023 : साखळीच्या प्रभाग 1, 2 व 4 मध्ये तिरंगी लढती रंगणार

तिन्ही प्रभागांकडे संपूर्ण साखळीचे लक्ष

दैनिक गोमन्तक डिजिटल

Sanquelim Municipal Elections 2023 : साखळी नगरपालिका निवडणुकीतील रंगत बरीच वाढत चालली आहे. प्रचाराचे दोन दिवस शिल्लक असल्याने प्रचारात सर्वांनी स्वतःला झोकून दिले आहे. या नगरपालिकेच्या प्रभाग 1, 2 व 4 मध्ये तिरंगी लढत रंगणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. या तिन्ही प्रभागांकडे संपूर्ण साखळीचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रभाग 1 मध्ये माडकर विरुद्ध माडकर व त्यांच्या विरुद्ध हरवळकर

प्रभाग १ मध्ये सध्या नगरसेवक यशवंत माडकर यांना नगरसेविका कुंदा माडकर यांनी आव्हान दिले आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. तर या दोघांबरोबरच संतोष ऊर्फ सुभाष हरवळकर हेही रिंगणात आहेत.

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेल्या सुभाष हरवळकर यांनी या प्रभागात आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. या प्रभागातील अन्य एक उमेदवार गितेश माडकर यांनी आपली उमेदवारी मागे घेत संपूर्ण पाठिंबा भाजपच्या यशवंत माडकर यांना जाहीर केला आहे. या दोघांनाही टुगेदर फॉर साखळीच्या उमेदवार कुंदा माडकर यांचे आव्हान आहे.

प्रभाग २ मध्ये पाच उमेदवार; पण लढत तिघांमध्येच

प्रभाग २ ची निवडणूक ही बरीच लक्षवेधी ठरणार आहे. कारण या प्रभागात भाजपतर्फे निकिता नाईक, तर टुगेदर फॉर साखळीतर्फे नगरसेवक धर्मेश सगलानी यांची पत्नी ईशा सगलानी व प्रसादिनी कुडणेकर याही रिंगणात आहे. या प्रभागातील अन्य उमेदवार ज्योती गोसावी यांनी तर आपला प्रचारच बंद केला आहे.

तर उमेदवार नुरजहा अल्ताफ खान या प्रचार बंद करून आपल्या गावी गेल्या आहेत. अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रभागात भाजपच्या निकिता नाईक, टुगेदर साखळीच्या ईशा सगलानी व अपक्ष प्रसादिनी कुडणेकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

प्रभाग ४ मध्ये धर्मेश वि. रश्मी अशी लढत; एक नवखा उमेदवार

प्रभाग ४ च्या निकालाकडे संपूर्ण साखळीचे लक्ष लागून राहिले आहे. कारण या प्रभागात मागील कार्यकाळात एकत्रितपणे पालिका मंडळात असलेल्या व नंतर पक्षीय राजकारणात विभक्त झालेल्या दोन बड्या नगरसेवकांमध्ये लढत होत आहे.

टुगेदर फॉर साखळीचे माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्या विरोधात नगरसेविका रश्मी देसाई, अशी ही लक्षवेधी लढत आहे. या प्रभागात ओमकार फळारी एक युवा नवखा उमेदवार रिंगणात आहे. या लढाईत ते कशा पद्धतीने प्रचाराचा प्रभाव टाकतात, हे पाहावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT